Maratha Reservation: मराठा आरक्षण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार (Parth Pawar) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहेत. बीडमधील विवेक रहाडे (Vivek Rahade) या तरुणाच्या आत्महत्येनंतर पार्थ पवार यांनी हा महत्त्वापूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पार्थ पवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे. पार्थ पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या विवेकची बातमी ऐकून धक्का बसला. अशा दुर्दैवी घटनांची साखळी सुरु होण्यापूर्वी मराठा नेत्यांना जागं व्हावं लागेल. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करावा लागेल. यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे.
विवेकने आपल्या मनात प्रज्वलित केलेली ज्योत संपूर्ण यंत्रणा पेटवू शकते. संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आले आहे. मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही, असंही पार्थ पवार यांनी म्हटलं आहे. मी मराठा आंदोलनाची ज्वलंत मशाल घेण्यास तयार आहे. विवेक आणि इतर कोट्यवधी असहाय्य विवेकसाठी न्यायाचं दार ठोठावण्यासाठी तयार असल्याचंही पार्थ पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. (हेही वाचा - Akola Municipal Corporation: अकोला महापालिका सर्वसाधारण सभेत गोंधळ; सत्ताधारी, विरोधकांमध्ये शाब्दिक बाचाबाची)
I am ready to carry the burning torch of Maratha agitation in my heart and knock the doors of justice for Vivek and millions of other helpless ‘Viveks’.
Jai Hind. Jai Maharashtra.
— Parth Pawar (@parthajitpawar) September 30, 2020
दरम्यान, बुधवारी बीड जिल्ह्यातील विवेक रहाडे या तरुणाने नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने निराश होऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर विवेकच्या नातेवाईकांनी त्याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा दावा केला होता. सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर 2020 रोजी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. या स्थगितीनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.