Akola Municipal Corporation: अकोला महापालिका सर्वसाधारण सभेत गोंधळ; सत्ताधारी, विरोधकांमध्ये शाब्दिक बाचाबाची
Shiv Sena,BJP | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Akola Municipal Corporation General Meeting: अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधरण सभेत पुन्हा एकदा गोंधळ पाहायला मिळाला आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये झालेल्या शाब्दीक चकमकीनंतर ही सभा अर्ध्यातच गुंडाळावी लागली आहे. मागील सभेच्या नावाखाली मंजूर करण्यात आलेल्या विषयाबाबत आजच्या बैठकीत विरोधकांनी सत्ताधारी पक्षाकडे विचारणा केली होती. दरम्यान, शिवसेना गट नेते राजेश मिश्रा आणि भाजपचे जेष्ठ नेते माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या बाचाबाची झाली. त्यातूनच हा वाद शिगेला गेला. त्यानंतर शिवसेनेसह विरोधीपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे सदस्द महापौर अर्चनाताई मसने यांच्यापुढे एकत्र झाले. महापालिकेत सुरु असलेल्या गोधळातच अर्चनाताई यांनी विषय सूचीवरील सर्व विषय मंजूर झाल्याचे जाहीर करत राष्ट्रगीताला सुरुवात केली.

बहुमताच्या जोरावर भाजप कोणतेही घेत आहेत. ज्या विषयाची सभागृहात चर्चाच झाली नाही. एवढेच नव्हेतर विषय पत्रिकेवर विषय नव्हते ते देखलील विषय दाखवून मंजूर केले जात आहे. त्याची माहिती सभागृहात देण्याचे टाळण्यासाठी व आपला हित साध्य करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी ही सभा गुंडाळली आहे, असा आरोप राजेश मिश्रा यांनी केला आहे. तर, विषय पत्रिकेवर गुंठेवारीच्या प्रकरणाची चौकशी करण्याचा विषय होता. ज्यामुळे शिवसेनेचे अनेक नेते यात अडकणार, या भितीने शिवसेनेने महापालिकेत गोंधळ घालून त्यांच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे, विजय अग्रवाल म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Agriculture Laws 2020: महाविकासआघाडी सरकारचा केंद्रला धक्का, कृषी कायदा अंमलबजावणीबाबतचा अध्यादेश स्थगित

अकोला महानगरपालिकेच्या सलग तिसऱ्या सभेत वादळी चर्चा झाली. तसेच नगरसेवकांचा गोंधळ पाहायला मिळाला आहे. यापूर्वी 2 जुलै आणि 31 जुलैच्या सभेत विरोधीपक्षातील नेत्यांनी गदारोळ घातला होता.