Lok Sabha Elections 2019: पनवेल येथे प्रचारासाठी उशिर होतोय म्हणून पार्थ पवार यांची पळापळ, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video)
पार्थ पवार (फोटो सौजन्य-फेसबुक)

Lok Sabha Elections 2019: येत्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) मावळ येथे पार्थ पवार (Parth Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उमेदवारी दिल्यानंतर पार्थ यांनी पहिले भाषण तर दिलेच मात्र नेटकऱ्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आल्या. तसेच मराठी असून स्पष्ट बोलता येत नसल्याचे म्हणत काहींनी त्यांची खिल्ली उडवली. त्यानंतर इस्काॉनच्या मंदिरात हरे राम कृष्णाच्या गाण्यावर ठेका धरल्याचा व्हिडिओसुद्धा नुकताच सोशल मीडियावर पाहायला मिळाला. त्यावेळीसुद्धा नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.

पार्थ पवार यांनी सीएसएमटी ते पनवेल असा लोकलने प्रवास करत लोकांशी संवाद साधला. त्याचदिवशी रात्री पनवेल येथे पार्थ पवार मोहल्ला परिसरात प्रचारासाठी येणार होते. मात्र प्रचारासाठी देण्यात आलेल्या वेळेनुसार पोहचू शकत नसल्याने पार्थ पवार यांनी चक्क गाडी सोडून रस्त्यावरुन धावताना दिसून आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(हेही वाचा-व्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन)

तर नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा पार्थ पवार यांच्यावर ट्रोल करण्यात आले आहे. तसेच सभेसाठी उशिर होत असल्याने पळत असल्याचे म्हटले जात आहे. त्याचसोबत पार्थ पवारांची ही स्टंटबाजी असल्याची टीकासुद्धा सोशल मीडियावर केली जात आहे.