परळी: धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून व्यापाराला मारहाण; राष्ट्रवादी कार्यकर्ते गणेश कराड यांच्यासह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल
(Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांकडून एका व्यापाराला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना परळी (Parli) येथील टॉवर चौक (Tower Chouk) परिसरात घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांकडून राष्ट्रवादीचे नेते गणेश कराड (Ganesh Karad) यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच व्यापारी अमर देशमुख (Amar Deshmukh) यांना मारहाण करणारे हे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आणि समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे समर्थक असल्याची माहिती समोर आली आहे. गणेश कराड आणि अमर देशमुख यांच्यात संपत्तीवरून वादा झाला. यातून कराड यांच्या सरकाऱ्यांनी अमर देशमुख यांच्यावर हल्ला केला. यात अमर देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना परळीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या चारही आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या मागावर असल्याचे समजते आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाराला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गणेश कराड आणि अमर देशमुख यांच्यामध्ये संपत्तीवरुन वाद सुरु होता. या वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. यामधूनच कराड यांच्या सहकाऱ्यांनी देशमुख यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. काठ्या आणि रॉडने देशमुखांवर कराड यांनी हल्ला केला. जखमी झालेल्या देशमुख यांना परळीच्या शसकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मुंडे समर्थकांनी टॉवर चौकामधील गाड्यांची केलेली तोडफोड केली आणि सार्वजनिक मालमत्तेची नासधूसही केली. कराड हे मुंडेचे जवळचे कार्यकर्ते समजले जातात. देशमुख यांना मारहाण करणाऱ्या गणेश कराड आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांविरोधात संभाजी नगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. कराड हे मुंडेचे जवळचे कार्यकर्ते आहेत असे सांगितले जात आहे. हे देखील वाचा- मुंबई: माटुंगा रेल्वेस्थानकात तरुणीचे बळजबरी चुंबन घेणाऱ्या तरुणाला नितीन नांदगावकर यांनी दिला चोप; पहा व्हिडिओ

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या तोडफोड आणि मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी अशाप्रकारे भरचौकात तोडफोड आणि हणामारी केल्याने या प्रकरणाची परळीमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर धनंजय मुंडे यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.