
मुंबईतील (Mumbai) मांटुगा रेल्वे स्थानकात (Matunga Railway Station) बळजबरीने तरुणीच्या गालावर चुंबन घेणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. त्यानंतर पुन्हा एकदा तरुणीच्या सुरक्षिततेबाबत आणि पुरुषांच्या विकृतीबद्दल चर्चा रंगायला लागल्या. मात्र याबाबत कोणतीही तक्रार दाखल न झाल्याने पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीला सोडून दिले. परंतु, या आरोपीला शिवसैनिक नितीन नांदगावकर (Nitin Nandgaonkar) यांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. आरोपीला चांगलाच चोप देत पुन्हा कधीही कोणत्याही महिलेची छेड काढणार नाही, असे नांदगावकरांनी त्याचाकडून वदवून घेतले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मुंबई: महाराष्ट्र पोलिस वर्दीवर हात उचलणार्यांना तेथेच ठोका अन्यथा मी ठोकेन: नितीन नांदगावकर (Watch Video)
हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर यावर संमिश्र प्रतिक्रीया येत आहेत. काहीजण नांदगावकरांच्या कामाचे समर्थन करत आहेत तर काहीजण कायदा हातात का घेतला, असा सवाल करत आहेत. मात्र शिवसैनिक म्हणून महिलांची सुरक्षा करणं ही आमची जबाबदारी आहे आणि यापुढे महिलांची छेडछाड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असं नितीन नांदगावकर यावेळी म्हणाले.
पहा व्हिडिओ:
काही दिवसांपूर्वी मांटुगा पुलावरुन जाणाऱ्या एका तरुणीचा पाठलाग करत एक तरुण जात होता. तिला काही कळायच्या आत तिच्या अंगाला स्पर्श करत तिचे चुंबन घेतले. या प्रकाराबाबत तरुणीने कोणतीही तक्रार दाखल केली नसली तरी माटुंगा रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत हा सर्व प्रकार कैद झाला होता.
तरुणीची छेड काढणारा हा आरोपी विवाहीत असून त्याला चार मुले आहेत. तो भायखाळा येथील एका कारखान्यात सोफ्याचे काम करत असून तो मीरारोडचा रहिवासी आहे.