'पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात' संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
Pankaja Munde And Sanjay Raut (Photo Credit: IANS and instagram)

महाराष्ट्रात (Maharashtra) महाविकासआघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार स्थापन झाले असून भाजपसाठी (BJP) हा मोठा धक्का मानला जात आहे. यातच माजी ग्रामीण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासह भाजपचे 12 बडे नेते शिवसेनेच्या (ShivSena) संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. यामुळे भाजपला दुसरा राजकीय धक्का लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्वाचे म्हणजे, पकंजा मुंडे यांनी रविवारी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच पंकजा मुंडे यांनी त्याच्या ट्विटरच्या हॅण्डलवरुन भाजप उल्लेख हटवून येत्या 12 डिसेंबर रोजी मोठा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी घोषीत केले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने अधिक जागा मिळवल्या तरी देखील त्यांना राज्यात सत्ता स्थापन करण्यास अपयश आले. पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपसाठी हा दुसरा मोठा धक्का मानला जाईल. एकीकडे पकंजा मुंडे यांच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एवढेच नव्हेतर, त्यांनी त्यांच्या फेसबूक आणि ट्विटरच्या खात्यावरील भाजप शब्दाचा उल्लेख हटवला आहे. त्याचबरोबर येत्या 12 डिसेंबर रोजी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाले आहे. तर, दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनोखे वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा-पंकजा मुंडे यांनी भावनिक फेसबूक पोस्ट नंतर ट्विटर हॅन्डलवरून 'BJP'हटवले; 12 डिसेंबरला करणार मोठी राजकीय घोषणा

महत्वाचे म्हणजे, पंकजा मुंडे यांनी त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण पक्षाच्या कामासाठी घालवले आहेत. यामुळे पंकजा मुंडे यांची विरोधी पक्षनेते पद किंवा प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात यावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी केली आहे.