पंकजा मुंडे यांनी भावनिक फेसबूक पोस्ट नंतर ट्विटर हॅन्डलवरून 'BJP'हटवले; 12  डिसेंबरला करणार मोठी राजकीय घोषणा
पंकजा मुंडे (Photo Credit : Youtube)

माजी ग्राम विकास मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी फेसबूकच्या (Facebook) पोस्टनंतर ट्विटर (Twitter) खात्यावरुनही भाजप शब्द हटवले. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पंकजा मुंडे यांनी रविवारी फेसबुकवर एक पोस्ट लिहून 12 डिसेंबर रोजी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे घोषित केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. सध्या पकंजा मुंडे शांत असून त्यांच्या मनात काय चालू आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यातच पंकजा मुंडे यांनी त्यांच्या फेसबूक आणि ट्विटरच्या हॅण्डलवरुन भाजप उल्लेख काढून टाकल्यामुळे राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाला होता. सध्या पंकजा कोणत्याही सभागृहाच्या प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे त्यानी भाजपचा उल्लेख काढला असवा असेही म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते ज्योतीरादित्य शिंदे यांनीही त्यांच्या खात्यावरील अशाचप्रकारे उल्लेख काढला होता. त्यावेळीही राजकारणात मोठी चर्चा रंगली होती.  याआधी पंकजा मुंडे यांच्या प्रोफाईलचे यूजरनेम पंकजा मुंडे, भाजप असे होते. पण आता ट्विटरवर पेजवर फक्त @Pankajamunde लिहले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याची सध्या चर्चा आहे. हे देखील वाचा- मनसे आक्रमक! राज्यात परराज्यातून येणाऱ्या लोढ्यांना निर्बंध बसण्यासाठी देशात NRC प्रमाणे SRC लागू करण्यात यावी, संदीप देशपांडे यांची मागणी

पंकजा मुंडे यांची फेसबूक पोस्ट-

पंकजा मुंडे या 12 डिसेंबर रोजी त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, असे त्यांनी फेसूबकच्या पोस्टमध्ये लिहले आहे. तसेच पंकजा मुंडे त्यावेळी कोणता निर्णय घेतील?  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.