Close
Search

OBC & Maratha Reservation: पंकजा मुंडे यांचा पण, 'नो फेटा, नो हार!'; वाचा सविस्तर

जोपर्यंत ओबीसी आरक्षण (OBC Reservation) पूर्ववत होत नाही आणि मराठा आरक्षण (Maratha Reservation) मार्गी लागत नाही तोवर कुणीही मला फेटा बांधायचा नाही. मी गळ्यात हारही घालून घेणार नाही, असा 'पण' पंकजा मुंडे यांनी केला आहे.

महाराष्ट्र अण्णासाहेब चवरे|

Pankaja Munde | (Photo Credit : Facebook)

भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आपल्या कार्यकर्त्यांवर भडकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्याच्या राजकीय वर्तुळात चर्चाही रंगल्या. आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे चर्चेत आल्या आहेत. या वेळी चर्चा आहे ती पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षण मुद्द्यावरुन केलेल्या पणावरुन. जोपर्यंत ओबीसी आरक्षण (OBC Reservation) पूर्ववत होत नाही आणि मराठा आरक्षण (Maratha Reservation) मार्गी लागत नाही तोवर कुणीही मला फेटा बांधायचा नाही. मी गळ्यात हारही घालून घेणार नाही, असा 'पण' पंकजा मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांचा हा पण तडी जाऊन आरक्षणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार का? अशी चर्चा आता रंगली आहे.

बीड येथे भाजप पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. या बैठकीला पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. बैठकीवेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की, मी लढाई लढविण्याचे ठरवले आहे. मी आज येथे तुम्हाला सांगते. जोवर ओबीसी आरक्षण पूर्ववत होत नाही, मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मला कुणीही फेटा बांधायचा नाही. मी हारही गळ्यात घलून घेणार नाही. पंकजा मुंडे यांनी निक्षूण सांगितल्यानंतर कार्यकर्ते या सूचनांचे पालण करणार की, पंकजा मुंडे यांना हार, फेटा स्वीकारण्यासाठी आग्रह करणार याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, NCP On BJP: ताई! पंख छाटणारा शकुणी मामु, डोक्याला तेल लावलेले धर्मराज, पोरी पळवणारे दुःशासनही तुमच्या पक्षात; अमोल मिटकरी यांचा पंकजा मुंडे यांना अप्रत्यक्ष सल्ला)

दरम्यान, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कऱ्हाड यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या भाजपच्या जनसंपर्क यात्रेत पंकजा मुंडे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे पंकजा मुंडे जोरदार चिडल्या. त्यांनी कार्यकर्त्यांना झाप झाप झापलं. कार्यकर्त्यांनी भागवत कऱ्हाड यांच्यासमोरच 'पंकजा मुंडे अंगार है... बाकी सब भंगार हैं...' अशा घोषणा दिल्या. यावर 'काय लावलंय हे.. मी सांगीतलं तुम्हाला या घोषणा द्यायला. हे अंगार-भंगार काय. दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम सुरु आहे का इथे? मूर्ख कुठचे. माझी जेवढी उंची आहे तेवढी लायकी ठेवा... नाहीतर येऊ नका परत मल भेटायला' अशा स्पष्ट शब्दांत पंकजा मुंडे यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना सुनावले आहे. त्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे.

NCP On BJP: ताई! पंख छाटणारा शकुणी मामु, डोक्याला तेल लावलेले धर्मराज, पोरी पळवणारे दुःशासनही तुमच्या पक्षात; अमोल मिटकरी यांचा पंकजा मुंडे यांना अप्रत्यक्ष सल्ला)

दरम्यान, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कऱ्हाड यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या भाजपच्या जनसंपर्क यात्रेत पंकजा मुंडे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे पंकजा मुंडे जोरदार चिडल्या. त्यांनी कार्यकर्त्यांना झाप झाप झापलं. कार्यकर्त्यांनी भागवत कऱ्हाड यांच्यासमोरच 'पंकजा मुंडे अंगार है... बाकी सब भंगार हैं...' अशा घोषणा दिल्या. यावर 'काय लावलंय हे.. मी सांगीतलं तुम्हाला या घोषणा द्यायला. हे अंगार-भंगार काय. दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम सुरु आहे का इथे? मूर्ख कुठचे. माझी जेवढी उंची आहे तेवढी लायकी ठेवा... नाहीतर येऊ नका परत मल भेटायला' अशा स्पष्ट शब्दांत पंकजा मुंडे यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना सुनावले आहे. त्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change