पोलिसांकडून महिलांना शिक्षा (Photo Credits-Times Of India)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लॉकडाउनचे आदेश लागू करण्यात आले आहेत. लॉकडाउनच्या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी नाही आहे. तसेच मासेमारी किंवा समुद्रावर जाण्यास ही मनाई आहे. याच दरम्यान पालघर मधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये सतपटी समुद्रावर शिंपल्या काढण्यासाठी गेलेल्या महिलांना पोलिसांकडून शिक्षा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी महिलांसह त्यांच्यासोबत असणाऱ्या पुरुष मंडळींना सुद्धा उठाबश्या काढण्याची शिक्षा दिली आहे. या प्रकरणी आता केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाने पालघर पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

टाईम्स ऑफ इंडिया यांनी दिलेल्या वृत्तानुसार,  सोशल मीडियात व्हायरल झालेला मेसेज सतपटी समुद्रकिनाऱ्यासंबंधित पोलिसांकडून शूट करण्यात आला आहे. तर समुद्रावर शिंपल्या काढण्यासाठी काही महिला गेल्या होत्या. पण त्यांना पोलिसांकडून उठाबश्या काढण्याची शिक्षा दिली आहे. तसेच पोलिसांकडून हा व्हिडिओ गावात आता व्हायरल करणार असल्याचे ही महिलांना सांगण्यात येत आहे. पोलिसांनी महिलांना दिलेल्या या शिक्षेचा व्हिडिओ मच्छिमारांमध्ये तुफान वेगाने व्हायरल करण्यात आला आहे. (Coronavirus Lockdown: मुंबईत काम करणाऱ्या 5 जणांचा ऑटोरिक्षाच्या माध्यमातून बिहारकडे प्रवास)

मच्छिमारांनी असे म्हटले आहे की, लॉकडाउनच्या काळात मत्सव्यवसायासाठी बंदी नाही आहे. परंतु सखोल भागाच्या ठिकाणी मासेमारी केली जात नाही आहे. पण उथळ पाण्याच्या येथे मच्छिमार लहान बोटी घेऊन मासेमारी करत आहेत. मासेमारी सध्या कमी झाली असून त्याचा साठा ही कुठे करावा आणि त्याची वाहतूक कशी करावी अशी समस्या सुद्धा उद्धभवत आहे.एका मच्छिमाराने असे सांगितले की, महिला नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळेस समुद्राकडे जात शिंपल्या काढतात. सतपटी गावात येथे मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. लॉकडाउनच्या काळात मत्समारीच्या कामाला मोठा फटका बसल्याचे ही मच्छिमाराने म्हटले आहे.