सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत आजपासून 31 जुलै पर्यंत मासेमारी बंदी
Fishermen Boat | (Photo Credits: Twitter/ ANI)

मासळीच्या प्रजोत्पादनाच्या काळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत आजपासून 31 जुलैपर्यंत दोन महिने मासेमारी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अन्वये 1 जून ते 31 जुलै या साधारण दोन महिन्यांच्या कालावधीसाठी मासेमारी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, मागील आठवड्यातच हे आदेश देण्यात आले. याच धर्तीवर आता कोळी बांधवांनी त्यांची गलबतं समुद्रातून माघारी आणण्यास सुरुवात केली.

मच्छ विभागाच्या धोरणानुसार ही बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असले. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बिजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आली आहे.हेदेखील वाचा- IMD Monsoon Prediction: मान्सून यंदा पूरेपूर बरसणार! सरासरीच्या 101% पर्जन्यवृष्टीची शक्याता- हवामान विभाग

महाराष्ट्र सागरी नियमन अधिनियम 1981 अन्वये मासेमारीवर काही काळासाठी निर्बंध येणार असले तरीही मुंबईतील कुलाबा भागातील किनारपट्टीमध्ये 12 सागरी मैलांपर्यंत पारंपरिक पद्धतीने कोळी बांधव मासेमारी करु शकणार आहे. ब्रिटीश काळापासून सुरु असणारी ही मासेमारी मात्र थांबणार नाही. तौक्ते चक्रीवादळाचा फटका कोळी बांधवांना मोठ्या प्रमाणावर बसला. येत्या काळात मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट आणि इतर बादारपेठांमध्ये येणारी बहुतांश मासळी ही ओडिशा आणि कोलकाता येथून आलेली असेल, अशी माहिती दर्यावर्ती महिला संघाच्या अध्यक्षा राजेश्री विजय नाखवा (कुलाबा) यांनी ABP माझाशी बोलताना दिली.

दरम्यान भारतीय हवामान विभाग (IMD Monsoon forecast) वर्तवत असलेल्या अंदाजानुसा (IMD Monsoon Prediction) यंदा सरासरीच्या 101% इतका पाऊस पडू शकतो. यंदाचा मान्सून (Monsoon Rainfall 2021) हा नेहमीच्या तुलनेत सामान्यच राहणार असला तरी पर्जन्यवृष्टी मात्र पूर्ण क्षमतेने म्हणजेच 100% च्या आसपास होण्याची शक्यता आहे. भारतात प्रामुख्याने जून ते सप्टेंबर या काळात मान्सून बरसेल असे हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. दरम्यान, संपूर्ण मान्सून हंगामात पाऊस जर 96% ते 104% पडला तर या पर्जन्यवृष्टीला सामान्य मान्सून म्हणून ओळखले जाते. त्यामुळे कोळी बांधवांना मासेमारी करण्यावर आणखी निर्बंध येण्याची शक्यता आहे.