Palghar News: पालघर रेल्वे स्थानक परिसराजवळ सापडला 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह, खून झाल्याचा संशय
Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

Palghar News: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाच्या बाहेर एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. या घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडितेचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोमवारी पालघर पोलिसांनी या घटनेची माहिती माध्यमांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. हेही वाचा- इंदौर येथे इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडला कुजलेला मृतदेह, परिसरात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी २८ जानेवारी रोजी, नायगाव रेल्वे स्थानकाजवळील शौचालयाजवळ काही प्रवाशांना हा मृतदेह दिसला. प्रवाशांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली.पोलिस घटनास्थळी दाखल झाले. नायगाव पोलिस ठाण्याचे निरिक्षक मंगेश अंधारे यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मृतदेह पालघर येथील शासकिय रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी तपासणी सुरु केली, त्यानंतर मृताची ओळख पटली आहे.

भागोजी उत्तेकर असं मृताचे नाव आहे, पोलिस शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 302 (हत्या) अन्वये गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. भागोजी याचा मृत्यूचे नेमके कारण काय ? याचा शोध पोलिस घेत आहे. या घटनेनंतर रेल्वे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.