Indore Shocker: मध्य प्रदेशातील इंदौर येथे एका इमारतीच्या पाण्याच्या टाकीत गुरुवारी एका व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, ही घटना शहरातील प्रेस कॉम्प्लेस परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृताचे कारण अद्याप अस्पष्ट आहेत. त्यामुळे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिस या घटनेचा खुनाच्या बाजूने तपास करत असल्याची माहिती मिळाली आहे. (हेही वाचा- पार्कींगच्या वादातून एकाची निर्घृण हत्या, दाम्पत्यांना अटक,)
मिळालेल्या माहितीनुसार,परिसरात येणाऱ्या पाण्याची दुर्गंदी येत असल्याने पाण्याची टाकी साप करण्यासाठी सुचना दिली. पाण्याच्या टाकीत मृतदेह असल्याची परिसरात बोंबाबोब झाली. काल सांयकाळी 4.30 च्या सुमारास भुमिगत पाण्याच्या टाकीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. नंतर ही घटना पोलिसांना सांगण्यात आली. पोलिस घटनास्थळी येताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. परिसरात चौकशी केल्यानंतर मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने कोणतेही दावे पोलिसांकडून देण्यात आले नाही.
मृतदेहाच्या अंगावर कोणत्याही जखमा आढळून आल्या नाही त्यामुळे कोणाताही दावा पोलिसांनी केला नाही. मृताची ओळख व्हावी याकरिता फोटो काढून परिसरात आणि जवळच्या पोलिस ठाण्यात शेअर करण्यात आले. शाहरुख पटेल असं मृताचे नाव असून तो चित्रकार असल्याचे समोर आले. तो विजय नगर येथील रहिवासी होता. ३१ डिसेंबर पासून तो राहत्या ठिकाणपासून बेपत्ता असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. पोलिस ठाण्यात कुटुंबियांनी शाहरुख बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. मृतदेह पाण्यात कसा आला आणि त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. त्यामुळे या गुढ रहस्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहे.