स्वतंत्र पालघर जिल्हा झाल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या डॉ. उज्ज्वला काळे नगराध्यक्ष झाल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे यांचा 1069 मतांनी विजय झाला असून महायुतीच्या उमेदवार श्वेता पाटील यांचा पराभव झाला आहे.

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर विजयचा पहिला कल शिवसेनेच्या बाजूने झुकलेला दिसला. त्यानंतर आता हाती आलेल्या माहितीनुसार, सेना-भाजपा युतीची बहुमताकडे वाटचाल होत आहे. 

शिवसेना- 14

भाजपा- 06

राष्ट्रवादी काँग्रेस- 03

इतर- 05

 

मतमोजणीला सकाळी 10 पासून सुरुवात झाली असून शिवसेनेला पहिला कल मिळाला आहे.

पालघर नगरपरिषदेसाठी रविवार (24 मार्च) मतदान पार पडले. दिवसभरात सुमारे 67% मतदान झाले. या नगरपरिषदेत शिवसेना-भाजप-रिपाई (आठवले गट) युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी-बहुजन विकास आघाडी असा सामना रंगला आहे.

पालघर नगरपरिषदेच्या 14 प्रभागांसाठी 28 जागांसाठी काल मतदान पार पडले. आज या निवडणूकीचा निकाल लागणार आहे. जिल्हा कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात सुमारे 67% मतदान झाले. लवकरच मतमोजणीला सुरुवात होईल.

पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतरची ही पहिलीच निवडणूक असून यात काँग्रेस-राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष असा हा सामना रंगला. या निवडणूकीत भाजपने 8 जागा तर शिवसेनेने 18 जागा लढवल्या आहेत.

22 मार्चला निवडणूक प्रचारसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह युवासेनेचे आदित्य ठाकरे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी हजेरी लावली होती.

नगराध्यपदाचे उमेदवार

उज्ज्वला केदार काळे (महाआघाडी-राष्ट्रवादी)

अंजली परेश पाटील (शिवसेना-बंडखोर)

श्वेता मकरंद पाटील (महायुती-शिवसेना)

मतमोजणीला सुरुवात झाली असून लवकरच निवडणूकीचे निकाल हाती येतील.