Rape | Representational Image (Photo Credits: ANI)

महाराष्ट्राच्या (Maharashtra) पालघर (Palghar) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका आदिवाशी महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पीडित महिला ही आरोपीच्या शेतजमिनीवर गेल्या काही वर्षांपासून शेतजमिनीवर काम करीत होती. याचदरम्यान, आरोपीने पीडिताला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. मात्र, पीडिता गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिला. त्यानंतर पीडिताने स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही गेल्या 5 वर्षांपासून आरोपी सागर पाटील याच्या शेतजमिनीवर काम करीत होती. दरम्यान, आरोपीने पीडिताला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, गर्भवती राहिल्यानंतर पीडिताने आरोपीकडे लग्न करण्याची मागणी केली. परंतु, आरोपीने लग्नास नकार दिला. त्यानंतर पीडिताने आणि तिच्या कुटुंबीयांनी आरोपीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी बुधवारी आरोपीला अटक केली आहे. हे देखील वाचा- Mumbai: आईवर अत्याचार करणाऱ्या बापाच्या डोक्यात हातोडा घालून केली हत्या, मुंबईच्या दहिसर परिसरातील धक्कादायक घटना

एएनआयचे ट्वीट-

या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (2) (बलात्कार) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) आणि एससी/एसटी कायद्याच्या 3 (2) (अ) अंतर्गत अटक केली. या घटनेनंतर आजुबाजूच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.