महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे राज्य सरकारडून कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच सध्या राज्याअंतर्गत प्रवासाठी ई-पास गरजेचे असल्याच्या नागरिकांना सुचना देण्यात आल्या आहेत. परंतु ई-पास संदर्भात गेल्या काही दिवसांपासून काळाबाजार आणि नागरिकांची फसवणूक करण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. याच दरम्यान आता पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी बनावट ई-पास बनवणाऱ्या भामट्यांपासून सावध राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.(Coronavirus Lockdown in Thane: ठाणे जिल्ह्यामध्ये कंटेन्मेंट झोन साठी लॉकडाऊन 31 ऑगस्ट पर्यंत कायम!)
नागरिकांना बनावट ई-पास बनवून देण्याप्रकरणी नालासोपारा मधील गणेश झेरॉक्स आणि रामदेव झेरॉक्स सेंटर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी सुद्धा पोलिसांनी नागरिकांना ई-पास बनवुन देणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतले होते. हे आरोपी नागरिकांना प्रवासाठी लागणारे ई-पाससह खोटे वैद्यकिय प्रमाणपत्र सुद्धा बनवून देत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे नागरिकांनी अशा व्यक्तींपासून सावध रहावे असे सांगण्यात आले आहे. (मुंबईतून तब्बल 21.39 लाखांचे बनावट N95 मास्क जप्त, एकाला अटक)
#पालघर जील्हातील नागरिकांनी बनावट #इपास बनवणाऱ्या भामट्यांपासून सावध राहण्याचं जिल्हाधिका-यांचं आवाहन. अशाच एका प्रकरणात जिल्ह्यातल्या #नालासोपारा इथल्या गणेश झेरॉक्स सेंटर आणि रामदेव झेरॉक्स सेंटर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.@InfoPalghar@Palghar_Police
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) August 2, 2020
त्याचसोबत कोरोना संकटाच्या काळात सध्या व्हाट्सॲप असा फसवा मेसेज फिरत आहे की, एक विशिष्ट मोबाईल ॲप डाऊनलोड केले तर तर, तुम्ही घरच्या घरी आपले Body Pulse व रक्तातील Oxygen चे प्रमाण मोजू शकता. त्याकरिता स्वतंत्ररित्या Pulse Oxy Meter हे उपकरण घ्यायची गरज नाही. या मेसेजसोबत सदर मोबाईल ॲप डाउनलोड करायची लिंक दिलेली असते. त्यामुळे महाराष्ट्र सायबर विभागातर्फे सर्व नागरिकांना अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन करण्यात येत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अशा मोबाईल ॲप्स वरून Oxygen च्या प्रमाणाचे आकडे हे अचूक नसतात असे सांगण्यात आले आहे.