मुंबईतून तब्बल 21.39 लाखांचे बनावट N95 मास्क जप्त, एकाला अटक
N-95 Mask Photo Credits: Instagram/ the_maskwala

कोरोना व्हायरसने (Coronavirus) सर्वत्र थैमान घातले असल्याने रुग्णांचा आकडा दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. यासाठी कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोनासंदर्भातील औषधे, मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार करण्यात येत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर आता सुद्धा मुंबईतून तब्बल 21.39 लाखांचे बनवट N95 मास्क पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट-3 यांनी ही कारवाई केली असून त्यांना बनावट मास्क संदर्भातील टीप मिळाली होती. जप्त करण्यात आलेल्या मास्कमध्ये N95 आणि V-410 यांचा समावेश असून त्यांची किंमत 21.39 लाख रुपयापर्यंत आहे. गुन्हे शाखेकडून मास्क संदर्भातील गोष्टी लोअर परेल येथील पोद्दार मिल परिरातून जप्त केल्या आहेत.(मुंबई: BEST लपवत आहे कोरोना व्हायरस मुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या; आतापर्यंत 107 जणांचा मृत्यू, युनियनचा दावा)

तर सध्या कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मास्कची गरज अधिक वाढली आहे. खासकरुन वैद्यकिय विभागातील कर्मचाऱ्यांना याची सर्वाधिक गरज असते. पोलिसांनी मास्क संदर्भातील मटेरियल अधिक किंमतीला विकले जात असल्याच्या एका टेम्पोला सुद्धा अडवत एकाला व्यक्तीला अटक केली आहे. सफदार हुसैन मोहम्मद जाफर मोमिन अशी व्यक्तीची ओळख पटली असून तो भिवंडीतील रहिवाशी असल्याची माहिती देण्यात आली आहे.(Maharashtra 'Mission Begin Again': महाराष्ट्रामधील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवला; मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये मॉल व मार्केट कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी, जाणून घ्या काय असेल सुरु)

दरम्यान, मुंबईत सध्या 1,11,991 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुगण आढळून आले आहेत. त्यापैकी 85,327 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 20,123 जणांवर उपचार करण्यात येत आहेत. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 72 दिवस झाला आहे. मुंबई महापालिकेकडून गुरुवार पर्यंत 11,643 कोरोना व्हायरस संदर्भातील चाचण्या पार पडल्या आहेत. तसेच आतापर्यंत पाच लाखांहून अधिक चाचण्या गेल्या काही दिवसात पार पडल्याची माहिती देण्यात आली होती.