Coronavirus: बीड जिल्ह्यात केवळ 10 जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळ्याला परवानगी; जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : pixabay)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यामुळे सरकारी यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. मुंबई, पुणे पाठोपाठ अनेक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यात बीड (Beed) जिल्ह्याचाही समावेश आहे. याचपार्श्वभूमीवर बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांनी महत्वाचा आदेश दिला आहे. बीड जिल्ह्यात केवळ 10 जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करण्यास परवानगी देण्यात आली आहे. लग्न समारंभाच्या ठिकाणी कोरोना विषयक सामाजिक अंतराचे पालन करण्याच्या अटीवर विवाह सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होण्याची शक्यता आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. हे देखील वाचा- नांदेड जिल्ह्यात आजपासून संचारबंदी लागू; 'हे' असतील महत्त्वाचे नियम

ट्वीट-

कोरोनाचा फैलाव होऊन रुग्ण वाढू नये यासाठी प्रशासनाकडून वारंवार कुठलेही धार्मिक समारंभ, लग्न समारंभ राजकीय सभा घेण्यावर प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. मात्र, तरीदेखील परभणीच्या गंगाखेड येथील जिनिंग व्यावसायिकाने आपल्या मुलाच्या लग्नाचा स्वागत समारंभ आपल्या जिनींग मध्ये घेतला. परंतु, यानंतर या ठिकाणी 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. ज्यामुळे प्रशासनाने आता या जिनिंग चालकावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्याकडून या रुग्णांत संदर्भात लागलेला सर्व खर्च वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.