कांद्याचे दर होणार आणखी कमी; जाणून घ्या आजचा कांद्याचा दर
Onions (Photo Credits: IANS)

Onion Price To Drop: अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, भाजीपाल्याचे भाव अगदी गगनाला जाऊन भिडले. अशात कांद्याचे भाव इतके वाढले की जनतेने कांदा खाणंच बंद केलं. 120 रुपये किलो च्या दराने कांदा बाजारात विकला जात होता. या सर्वामुळे कांदा नुसता चर्चेचाच विषय बनला नाही तर त्यावर विनोद आणि मीम्स बनू लागले.

मात्र बुधवारी 120 रुपयांवरून कांदा 65 रुपये किलोवर आला आहे. तसेच, कांद्याचे दर अजून घसण्याची चिन्हं आहेत. News 18 लोकमतने दिलेल्या माहितीनुसार, 15 डिसेंबरनंतर अफगाणिस्तान, पाकिस्तानमधून आयात करण्यात आलेला कांदा बाजारात आणण्यात येणार आहे.

पाऊसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि म्हणूनच बाजारातील कांद्याचा पुरवठा कमी झाला. यामुळे साहजिकच कांद्याचे भाव वाढले. परंतु, ही दरवाढ रोखण्यासाठी, केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता. मागच्या आठवड्यात तर 150 रुपये किलो या दराने कांदा विकला जात होता.

अफगाणिस्तानमधून जो कांदा आयात करण्यात येत आहे तो बाजारात आल्यानंतर कांद्याचे दर थेट 45 रुपयांवर पोहोचतील.

कांदा शंभरीपार! नेटीझन्सनी बनवले TikTok वर मजेशीर व्हिडिओ (Watch Video)

दरम्यान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशांमधून कांदा आयात करण्यावर शेतकरी वर्गाने मोठी नाराजी वाजता केली आहे. परंतु, तसं असलं तरी कांद्याच्या होणाऱ्या कमी किंमतीमुळे, सामान्य जनतेला मात्र दिलासा मिळणार आहे. कारण आपल्या देशात, जवळपास सर्वच पदार्थात कांदा हमखास वापरला जातो.