कांदा शंभरीपार! नेटीझन्सनी बनवले TikTok वर मजेशीर व्हिडिओ (Watch Video)
(Photo Credit - Tik Tok Video)

राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका कांदा पिकाला बसला आहे. देशभरात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. ग्राहकांना कांदा विकत घेणं आता कठीण होऊन बसलं आहे. सध्या घाऊक बाजारात जुन्या कांद्याचे दर 80 ते 90 रुपये किलो पर्यंत पोहचले आहेत. तर किरकोळ बाजारात कांदा 100 रुपये किलो दराने विकला जात आहे. तसेच हैदराबादमध्ये कांदा 150 रुपये दराने विकला जात आहे. दरम्यान, नेटिझन्सनी कांद्याचे दर पाहून TikTok या अॅपवर मजेशीर व्हिडिओ तयार केले आहेत.

सध्या सोशल मीडियावर #OnionCrisis असा ट्रेंड सुरू आहे. (हेही वाचा - कांदा चिरताना डोळ्यातून पाणी का येते माहितेय? जाणून घ्या कारण)टीक टॉक या अॅपवर अनेक युजर्सनी कांद्याच्या दरासंदर्भात अनेक मजेशीर व्हिडिओ बनवले आहेत. यातील काही व्हिडिओमध्ये काही लोकांनी कांद्याची चोरी केली आहे. तर काहींना दागिन्यांप्रमाणे कांदा कपाटामध्ये ठेवला आहे. तसेच काहींनी तर कांद्या भाजीमध्ये न टाकता केवळ किचनमध्ये अडकवला असून त्याचा वास घेऊन भाजी बनवली आहे. तसेच काहींनी तर वस्तू खरेदी करताना पैशांऐवजी कांदाच दिला आहे.

 

सध्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांतून कांद्याच्या दरात मोठया प्रमाणात मागणी वाढ झाली आहे. मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारपेठांमधील कांद्याची आवक घटली आहे. कांदा शंभरीपार झाल्याने गृहिणींचे गणित कोलमडले आहे.