महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरस महामारी नवी चिंता निर्माण करत आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी कोरोनाचा (Omycron) नवा स्ट्रेन ओमायक्रोन पुन्हा एकदा आव्हान ठरत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीवरुन ओमायक्रोन रुग्णांची एकूण संख्या झपाट्याने वाढत आहे. आज (27डिसेंबर) सकाळी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार देशभरात ओमायक्रोनचे सुमारे 578 रुग्ण आढळले आहेत. यात दिल्ली (Delhi) आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) ओमायक्रोन संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जाणून घ्या ओमायक्रोन रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी.
एकूण ओमायक्रोन संक्रमितांची संख्या महाराष्ट्र आणि दिल्ली या राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. तर दिल्ली हे भारताच्या राजधानीचे शहर. त्यामुळे सहाजिकच या दोन्ही ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रवास मोठ्या प्रमाणावर होतो. परिणामी या दोन्ही ठिकाणी ओमायक्रोन असो वा कोणत्याही आंतरराष्ट्रीय महामारीच्या संसर्गाचे प्रमाण अधिक मोठ्या प्रमाणावर वाढते, असे तज्ज्ञ सांगतात. (हेही वाचा, Covaxin Booster Shot: भारत बायोटेकला कोवॅक्सिन बूस्टर शॉटच्या प्रभावाची चाचणी घेण्यासाठी DCGI कडून मागितली परवानगी)
राज्याचे नाव- ओमायक्रोन रुग्णसंख्या - डिस्चार्ज
- दिल्ली- 142 23
- महाराष्ट्र 141 42
- केरळ 57 23
- गुजरात 49 10
- राजस्थान 43 30
- तेलंगना 41 10
- तामिळनाडू 34 00
- कर्नाटक 31 15
- मध्य प्रदेश 09 07
- आंध्रप्रदेश 06 01
- पश्चिम बंगाल 06 01
- हरियाणा- 04 00
- ओडिशा 04 00
- चंडिगड 03 03
- जम्मू आणि कश्मीर 03 03
- उत्तर प्रदेश 02 02
- हिमाचल प्रदेश 01 01
- उत्तराखंड 01 01
एकूण- 578 151
दरम्यान, COVID19 | गेल्या 24 तासांत भारतात 6,531 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर 7,141 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. देशभरात सध्यास्थितीत सक्रिय रुग्णसंख्या 75,841 वर आहे. पुनर्प्राप्ती दर सध्या 98.40% आहे. तर, ओमिक्रॉन प्रकरणाची संख्या578 झाली आहे.