ST Bus (File Image)

App for Real-Time Bus Tracking: लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, आता राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने एक नवीन अॅप लाँच (ST Corporation Launches App) केले आहे. या अॅपमुळे प्रवाशांना त्यांच्या मोबाइल डिव्हाइसवर लालपरी बसेसचे स्थान ट्रॅक करता येणार आहे. या अॅपद्वारे, प्रवाशांना त्यांच्या एसटी तिकिटावरील क्रमांकाच्या आधारे त्यांच्या निवडलेल्या बस स्टॉपवर बसची अपेक्षित आगमन वेळ देखील समजणार आहे. हे अॅप एसटी ताफ्यातील सर्व वाहनांमध्ये स्थापित केलेल्या व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम (Vehicle Tracking System) शी एकत्रित केले आहे. ज्यामुळे प्रवाशांना बस स्थानांबद्दल रिअल-टाइम माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

अॅपवर प्रवाशांना मिळणार बस थांब्यांची माहिती -

लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगाऊ तिकिटे खरेदी केल्यानंतरही त्यांच्या बसचे नेमके स्थान किंवा ती मध्यवर्ती थांब्यावर कधी पोहोचेल? याबद्दल अनिश्चिततेचा सामना करावा लागतो. परंतु, आता नवीन अॅप आणि व्हीएलटी प्रणालीसह, प्रवाशांना बस थांब्यांची माहिती आणि त्यांच्या निवडलेल्या स्टॉपवर येण्याच्या अपेक्षित वेळेची माहिती मिळणार आहे. (हेही वाचा -ST Bus: दिवाळीत 'लालपरी'च्या कमाईत मोठी वाढ; दिवसाला 60 लाख प्रवासी वाहतूक, 31 कोटींची कमाई)

मुंबईत आधुनिक नियंत्रण कक्षाची स्थापना -

प्राप्त माहितीनुसार, रोस मार्टा कंपनीने रूट मॅपिंग पूर्ण केले आहे. तसेच ते सिस्टममध्ये इन्टॉल केले आहे. ही प्रक्रिया पुढील काही आठवड्यात पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तथापी, राज्यभरातील सिस्टमचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई सेंट्रल येथे एक आधुनिक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. (हेही वाचा - ST Bus: सहा वर्षानंतर पहिल्यांदाच एसटी फायद्यात, जुलै महिन्यात कमावला 2 कोटींचा नफा)

बसचे स्थान ट्रॅक होणार -

नियंत्रण कक्ष एसटी बसेसचे रिअल-टाइम ट्रॅक करेल. प्रवासी त्यांच्या तिकिटातून ट्रिप कोड अॅपमध्ये प्रविष्ट करू शकतात. त्यामुळे त्यांच्या बसचे स्थान ट्रॅक होऊ शकेल. तसेच प्रवासी इतर मार्गांचे वेळापत्रकही पाहू शकतील आणि त्यांच्या बसेसचे थांबे देखील तपासू शकतील. लालपरीने प्रवास करणाऱ्यांसाठी हे अॅप अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.