Narayan Rane On Uddhav Thackeray: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांचा उल्लेख 'गद्दार', असा केला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केलेली नाही. तर स्वतः उद्धव ठाकरे यांनीचं शिवसेनेशी गद्दारी केली आहे, अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली आहे.
नारायण राणे यांनी म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या कडवट शिवसैनिकाशी गद्दारी केली. पक्षातील आमदारांना कधीच सहकार्य केले नाही. जे काम केले ते फक्त नातेवाईक आणि मोतश्रीसाठी केले. भाजप आणि जनतेशी गद्दारी करत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केले. स्वत: राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हातात घेतल्या. (हेही वाचा - Mumbai Metro 3 Route: मुंबई मेट्रो लाइन-3 ची ट्रायल रन यशस्वी; जाणून घ्या मार्गावरील Cuffe Parade ते SEEPZ पर्यंत सर्व स्थानकांची नावे)
दरम्यान, गणेशोत्सवानंतर उद्धव ठाकरे राज्य दौऱ्यावर निघणार आहेत. तसेच सध्या दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. उद्धव यांच्याकडे दसरा मेळाव्यात बोलण्यासारखं काय आहे? असा सवाल करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
नारायण राणे यांच्या टीकेला प्रतिउत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, भाजपने उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलण्याची सब कंत्राटे काढली आहेत. ही सब कंत्राटे मिळवण्यासाठी अनेक नेते फार उतावीळ झाले आहेत. नवनीत राणा, नारायण राणे आणि राज ठाकरे ही सगळी मंडळी कंत्राट मिळवण्यासाठी उत्सुक आहेत.