रमाकांत आचरेकर निधन: सचिन तेंडुलकरने सरकारी कार्यक्रमांवर बहिष्कार घालावा- संजय राऊत
Sachin Tendulkar and Sanjay Raut (Photo Credit- Getty & Twitter)

भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचे गुरु रमाकांत आचरेकर (Ramakant Achrekar) यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्याने मुंबई क्रिकेट वर्तुळात नाराजी पसरली आहे. तर यावर राजकीय नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त करताना यापुढे सचिन तेंडुलकरने सरकारी कार्यक्रमांवर बहिष्कार टाकावा असे म्हटले आहे. गुरु रमाकांत आचरेकर यांना शेवटचा निरोप देताना भावूक झालेला सचिन तेंडुलकर (Video)

यासंदर्भात संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले की, "पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित रमाकांत आचरेकर यांच्यावर महाराष्ट्र सरकारने राजकिय इतमामात अंत्यसंस्कार का केले नाहीत? हा आचरेकरांचा अपमान असून यापुढे सचिन तेंडुलकरने सर्व सरकारी कार्यक्रमांवर बहिष्कार घातला पाहिजे."

वृद्धापकाळातील व्याधींमुळे आचरेकर यांचे 87 व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. रमाकांत आचरेकरांच्या अत्यंसंस्काराला राज ठाकरेंसह अन्य मान्यवरांनी हजेरी लावली होती.

या प्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनीही या प्रकरणी खेद व्यक्त केला आहे. आचरेकरांवर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार न करणे हे अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.