रविवारी आणि रेल्वेचा ब्लॉक (Megablock) हे समीकरण बाजूला सारत पश्चिम रेल्वेने (Western Railways) प्रवाश्यांच्या सोयीसाठी शनिवारी रात्री रेल्वे रुळाच्या तपासणी व दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे ठरवले आहे. यामुळे उद्या म्हणजे 19 मे ला भाईंदर (Bhayander) ते बोरिवली (Borivali) दरम्यान पश्चिम रेल्वेवर कोणत्याही प्रकारचा ब्लॉक ठेवण्यात येणार नाही. मात्र मध रेल्वे (Central Railway) वर मुलुंड (Mulund) ते माटुंगा (Matunga) दरम्यान तर हार्बर रेल्वेवर (harbour Railways) सीएसएमटी (CSMT) ते चुनाभट्टी (Chunabatti) /वांद्रे (Bandra) दरम्यान ब्लॉक घेण्यात येईल.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेच्या या निर्णयानुसार, शनिवारी रात्री 11.30 पासून ते रविवारी पहाटे 4.30 पर्यंत बोरिवली ते भाईंदर स्थानकांच्या दरम्यान अप तसेच डाऊन जलद मार्गावर ब्लॉकचे नियोजन करण्यात येईल. त्यामुळे ब्लॉकच्या वेळेत शनिवारी रात्री गाड्या धीम्या मार्गावरून किंचित उशिराने धावतील मात्र रविवारी पश्चिम रेल्वे पूर्णपणे ब्लॉक मुक्त ठेवण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेच्या प्रवाश्याना मात्र रविवारीचा ब्लॉक चुकणार नाही. मुलुंड ते माटुंगा दरम्यान सकाळी 11.15 वाजता पासून ते दुपारी 3.15 पर्यंत ब्लॉक घोषित करण्यात आलं आहे. यानुसार अप जलद मार्गावर रुळांचे काम करण्यात येणार असल्याने लोकल गाड्या रविवारी सुमारे 20-25 मिनिटे उशिराने धावतील तसेच रविवारी सकाळी 10.50 पासून मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईहून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस धीम्या मार्गावरून धावतील. यामुळे रविवारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकातून चालवण्यात येईल.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वे वर देखील रविवारी सकाळी 11.40 ते दुपारी 3.15 दरम्यान सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांच्या दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉकच्या वेळेत अप आणि डाऊन मार्गावरील संबंधित स्थानकांच्या दरम्यान लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच कुर्ला प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून पनवेल-कुर्ला मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येतील.