सिंधुदुर्ग: कणकवली शहरात यापुढे 'नो कंटेनमेंट झोन'; फक्त COVID-19 पॉझिटिव्ह रुग्णांची घरे सील करणार
Coronavirus in India | representational Image | (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून बरे होणा-या रुग्णांचे संख्येचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 306 कोरोनाचे रुग्ण आढळले असून त्यातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गावं कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र आता सिंधुदुर्गातील कणकवली शहरात यापुढे 'नो कंटेनमेंट झोन' असणार असून या शहरात आढळलेल्या COVID-19 रुग्णांची घरेच केवळ सील करण्याचा निर्णय नगरपंचायत समितीने घेतला आहे.

त्यासोबत कणकवली शहरात आढळलेल्या कोरोना रूग्णांच्या निवास परिसराची पाहणी जिल्हाधिकारी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. Coronavirus Update: मुंबई, ठाणे, पुणे सह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील आजची कोरोनाबाधितांची आकडेवारी पहा

राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 57 हजार 117 वर पोहोचली आहे. दुसरीकडे कालच्या दिवसात 5 हजार 714 जणांनी कोरोनावर मात केली आहे यानुसार आतापर्यंत 1 लाख 99 हजार 967 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुर्दैवाने आतापर्यंत 13 हजार 132 जणांची कोरोना विरुद्धची झुंज अयशस्वी ठरली आहे.

तर देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 13 लाख 36 हजार 861 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनाचे एकूण 31,358 रुग्ण मृत्यूमुखी पडल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.