Pooja Chavan Suicide Case and Nilam Gorhe (Photo Credits: Twitter)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आणि त्यात समोर आलेली मंत्र्यांशी संबंधित ऑडिओ क्लिप सध्या खूपच व्हायरल होत आहे आणि त्यात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव चर्चेत आल्याने हे प्रकरण आता आणखीनच चिघळत चालले आहे. यावर सर्वच राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ABP ने दिलेल्या वृत्तानुसार, "या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. जे पुढं येईल त्याप्रमाणे कारवाई होईल. पोलिसांनी तशा सूचना देण्यात आल्यात" अशी माहिती नीलम गो-हे यांनी दिली आहे.

"पूजा चव्हाण या घटनेचा तपास नि:पक्षपातीपणे होईल" अशी ग्वाही नीलम गो-हे यांनी दिली आहे. सोबतचं जे आरोप करत आहेत त्यांनी पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांची भेट का घेतली नाही? असा प्रश्न उपस्थित करत या गोष्टीचं राजकारण करू नये असेही मत त्यांनी व्यक्त केले.हेदेखील वाचा- पूजा चव्हाण प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना दिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले

"मृत्यू संशयास्पद झालेला आहे, यात कोणतीच शंका नाही. परंतु, पूजा चव्हाणच्या मृतदेहाचा पीएम रिपोर्ट अजून यायचा आहे. व्हायरल झालेल्या क्लिपबाबत व्हॉइस सॅम्पल पहावं लागणार आहेत. त्याचाही तपास होईल. कोणत्या पक्षाचा असा हा विषय नाही. पूर्ण तपास होईपर्यंत निष्कर्ष काढणं योग्य नाही. निःपक्षपातीपणे तपास होईल याची ग्वाही देते. त्यांना मंत्रीपदापासून दूर करायचं का नाही हा निर्णय तिन्ही पक्ष मिळून घेतील, असे म्हणत विरोधकांच्या मागणीवर नीलम गोऱ्हे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. सोबतचं जे सरकारवर आरोप करत आहे, त्यांच्यापैकी एकानेही पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांची भेट घेतली नसल्याची टीका गोऱ्हे यांनी केली. उगाच कोणत्याही गोष्टीचं राजकारण करू नये,"असेही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी "गेले काही दिवस काही महिने काही वेळेला आपलं असं लक्षात आलेलं आहे. आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न हा केला जातोय. तर असाही प्रयत्न होता कामा नये व याचबरोबर सत्य लपवण्याचाही प्रयत्न होता कामा नये. सत्य लपवण्याचा प्रयत्न होणार नाही. जे काही सत्य असेल ते पूर्ण चौकशीतून जनतेसमोर येईल" असे स्पष्टीकरण दिले आहे.