Pune News: फनफेअरमध्ये खेळत असताना विजेचा झटका लागून नऊ वर्षाचा मुलाचा मृत्यू, पुण्यातील घटना
Funfair PC Pixabay

Pune News: पुण्यातील (Pune) कात्रजमधून एका नऊ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. ही घटना 13 एप्रिलच्या शनिवारी रात्री घडली आहे. कात्रज परिसरातील राजस सोसायटी चौकाजवळ ही घटना घडली. राजस येथे फनफेअरमध्ये (Funfair) खेळताना शॉक (Electric Shock) लागून मुलाचा मृत्यू झाला. हेही वाचा- मांजर वाचवण्याच्या नादत पाच जणांनी गमावला जीव, अहमदनगर येथील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज येथील राजस सोसायटी परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी फनफेअर पार्क आहे. या पार्कमध्ये अनेक गोष्टी उपलब्ध होत्या. पाळणे, फुड स्टॉल, मिकीमाऊस अशी साधने मुलांच्या करमणूकीसाठी होती. सांयकाळी सात वाजल्यापासून हे पार्क सुरु होते. आजूबाजूच्या परिसरातील अनेक लहान मुलं येथे आले होते.

दरम्यान रात्री उशिरा पार्कमध्ये खेळत असताना एका नऊ वर्षाच्या मुलाला शॉक लागला आणि या दुर्दैवी घटनेत त्याचा मृत्यू झाल आहे. माहितीनुसार, पाळण्यामध्ये बसताना लोंखडी पायरीवरून चढत असताना त्याला शॉक लागला आणि तो बेशुध्द अवस्थेत खाली पडला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मुलासोबत त्याचे मित्र देखील होते. बेशुध् अवस्थेत त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.या घटनेची माहिती पोलिसांना आणि मृताच्या कुटुंबियांना दिली. परिसरात या घनटेमुळे एकच खळबळ उडाली आहे.