संजय राऊत वॉचमनशी हुज्जत घालणाऱ्या कुस्क्या म्हाताऱ्यासारखे: निलेश राणे
Nilesh Rane, Sanjay Raut (Photo Credits: Facebook, PTI)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी 'सामना' तील अग्रलेखातून तसेच आज सकाळी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका करण्याची संधी नेहमीप्रमाणेच दवडली नाही. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे नव्यानेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या निलेश राणे यांनी.

संजय राऊत यांच्यावर एकेरी उल्लेख करून टीका करणारे ट्विट माजी खासदार निलेश राणे यांनी लिहिले आहे. ‘संजय राऊत वॉचमनशी हुज्जत घालणाऱ्या कुस्क्या म्हाताऱ्यासारखे आहेत’ अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मीटिंग करायची ह्यांनी, एनडीएची मीटिंग शिवसेनेने नाकारली, पण संजय राऊत गल्लीतल्या त्या कुस्क्या म्हाताऱ्यासारखे आहेत, जे सगळं ठीक असेल, तरी सोसायटीच्या वॉचमनशी उगाच हुज्जत घालतात,’ असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.

या आधीही निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर अनेक टीका सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्या आहेत."संजय राऊत इतके गरीब आहेत, की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेले. बाकीचं राहू द्या, अगोदर त्यांना कुणीतरी TV आणि लाईट बिलचे पैसे द्या," असं त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर काही दिवसांपूर्वी लिहिलं होतं.

'येणाऱ्या काही दिवसांत शिवसैनिकच संजय राऊतला धरून मजबूत चोपेल'- निलेश राणे

दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’या मुखपत्रातील अग्रलेखातून, "शिवसेनेला एनडीएमधून बाहेर काढणारे तुम्ही कोण?" असा सवाल भाजपला केला आहे.