प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

[Poll ID="null" title="undefined"]मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्र राज्य उन्हाच्या झळांनी पोळून निघाले असून गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाली आहे. ही वाढ अशीच पुढे पाच दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच कोकण भागात पुधील 3-4 दिवसात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तविली आहे.

उन्हाने पोळून निघालेल्या विदर्भात गेल्या पंधरा दिवसांपासून कमाल तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. मराठवाडय़ातही कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत अधिक आहे. त्यानंतर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मध्य महाराष्ट्रातील तापमानातही अचानक मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली असून, बहुतांश ठिकाणी सध्या उष्णतेची लाट आहे. कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ३ ते ५ अंशांनी वाढला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, मालेगाव, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, ब्रह्मपुरी येथे सध्या उष्णतेची लाट आहे. ती पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

उन्हाळ्यात सब्जा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

 त्याचबरोबर कोकणातही तापमानात वाढ झाली आहे. मुंबई, रत्नागिरी येथील कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित वाढले आहे. राज्याच्या सागरी किनाऱ्यावर पुढील चार ते पाच दिवसांत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, डहाणू, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, गोव्यातील तापमान कमी होऊ शकणार आहे. मात्र अन्य राज्यात तापमान अधिकच राहणार आहे.

महाबळेश्वरचा पाराही वाढला आहे. तेथील कमाल तापमान सोमवारी ३५.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.