मुंबईची ओळख असलेल्या प्रसिद्ध अशा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (Sanjay Gandhi National Park) लवकरच नव्या वाघिणीचे (Tiger) आगमन होणार आहे. मात्र आज या उद्यानात नव्या वाघिणीचे आगमन होणार आहे. लोकसत्ताने दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर (Chandrapur) येथील वन्यजीव निवारा केंद्रातून या वाघिणीला प्रजननासाठी येथे आणण्यात येणार आहे. या वाघिणीचे वय 11 महिने इतके आहे. त्यामुळे इतक्या कमी वयात प्रजनन होऊ शकत नाही.
सध्या संजय गांधी उद्यानात बिजली, मस्तानी आणि लक्ष्मी अशा तीन प्रौढ वाघिणी आहेत. मात्र येथे नर वाघ नसल्यामुळे व्याघ्र विहारात प्रजनन होऊ शकले नाही. म्हणून गेल्या वर्षी नागपूर येथून सुलतान हा 5 वर्षांचा वाघ प्रजननासाठी आणण्यात आला होता. मात्र या वाघिणींचे वय अधिक असल्यामुळे प्रजनन होऊ शकले नाही. म्हणून प्रजननाकरिता या नव्या वाघिणीला संजय गांधी उद्यानात आणण्यात येणार आहे.हेदेखील वाचा- मुंबईची प्रसिद्ध राणीची बाग आता डिजिटल स्वरूपात; युट्यूब चॅनेल आणि ट्विटरच्या माध्यमातून जिजामाता उद्यान-प्राणीसंग्रहालयाला 'व्हर्च्युअल' भेट देणे शक्य
या वाघिणीच्या प्रजननामुळे संजय गांधी उद्यानात वाघांची संख्या वाढू शकते. या वाघिणीचे वय कमी असल्यामुळे सध्या तिला वेगळ्या पिंज-यात सुरक्षित ठेवण्यात येईल. प्रजननासाठी तिचे वय किमान अडीच वर्षे असणे गरजेचे आहे अशी माहिती राष्ट्रीय उद्यानाचे संचालक आणि वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांनी दिली आहे.
दरम्यान पर्यटकांना सध्या तरी या वाघिणीचे दर्शन घेता येणार नाही. मुख्य वनसंरक्षकांच्या परवानगीनंतरच त्यावर निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी पवईतील एका घराच्या छतावरुन हरिण पडली. त्या हरिणीवर अधिक उपचारासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले होते. ते हरिण देखील याच उद्यानात आहे.