Coronavirus (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या (COVID 19 Cases) वाढत आहे. अशातच नवा व्हेरिएंट समोर आल्याने आरोग्य यंत्रणा आता पुन्हा अलर्ट मोड वर गेली आहे. ठाण्यामध्ये मंगळवार (19 डिसेंबर) दिवशी एक कोरोना रूग्ण समोर आला आहे. या रूग्णावर ठाणे (Thane) पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्याप या रूग्णाला लागण झालेला कोरोना वायरस कोणत्या व्हेरिएंटचा आहे? याची माहिती समोर येऊ शकलेली नाही. पण नागरिकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घाला, हात धुत रहा आणि करोना प्रतिबंध करणारे नियम पाळणे गरजेचे असल्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.

दरम्यान ठाण्यातील ही कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण एक तरूणी आहे. ताप, सर्दी आणि दमा चा त्रास होत असल्याने काही दिवसांपूर्वी ती पालिकेच्या आरोग्य केंद्रात ती उपचारांसाठी आली होती. तिथे तिची कोरोना चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर तिला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील विशेष कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या या रूग्णाचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या NIV मध्ये पाठवण्यात आले आहेत. काही तपासणीनंतरच व्हेरियंट बद्दल खुलासा होईल अशी माहिती समोर येणार आहे.

सध्या भारतामध्ये केरळ, कर्नाटक राज्यात कोरोना रूग्णांमध्ये मोठी वढ दिसून येत आहे. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क परिधान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. Modi Government Covid Advisory: भारतात आढळला JN.1 विषाणूचा पहिला रुग्ण,कोविड-19 रुग्णांध्येही वाढ; केंद्राकडून राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी .

कोरोनाचा नवा सबव्हेरिएंट JN 1 समोर आला आहे. सध्या या व्हेरिएंट बद्दल चर्चा सुरू झाली आहे. WHO ने या व्हेरिएंटला 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून घोषित केले आहे. JN.1 पूर्वी त्याच्या मूळ वंशाच्या, BA.2.86 चा भाग म्हणून 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' चा एक प्रकार म्हणून वर्गीकृत करण्यात आला होता.