Navi Mumbai Accident: नेरुळ (Nerul) उड्डाणपुलावर कंटेनरने बाईला जोरदार धडक दिल्याने 30 वर्षीय तरुण जखमी झाला आहे. सोमवारी ही घटना घडली. या घटनेअंतर्गत कंटनेच्या चालकावर गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. बाईकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दुचाकीस्वार त्याच्या भावांसह रस्त्याच्या कडेला तपासणी करत असताना कंटेनरने त्याला अचानक धडक दिली. पोलीसांनी या घटनेची चौकशी सुरु केली आहे. विजय साळुंखे असे जखमीचे नाव असून तो कळवा येथील रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे भावंड बाईक वरून साताऱ्याहून कळव्याच्या दिशेने येत होते. सोमवारी पहाटे दीडच्या सुमारास त्यांचा बाईकचा बिघाड झाल्यामुळे रस्त्यात थांबले. बाईक तापसण्यासाठी थांबले असताना, मागून भरधाव येणाऱ्या कंटेनरने त्यांना धडक दिली. विजय हा कळवा येथील रहिवासी आहे.
या अपघाता विजय जखमी झाला त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंटेनर चालकाने कंटेनर सोडून घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. आरोपी चालकाला पकडण्यासाठी पोलीसांनी पथके तयार केली आहे,