Murder | (Photo Credits: PixaBay)

मुंबईमध्ये (Mumbai) गुन्हेगारी (Crime) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान मालाडमधून (Malad) हत्येची घटना समोर आली आहे. एका व्यकीने टेप रेकॉर्डरवर गाणी ऐकत असलेला आवाज कमी करण्यास नकार दिल्यानंतर रागाच्या भरात आपल्या शेजाऱ्याची हत्या (Murder) केली आहे. या आरोपाखाली एका 25 वर्षीय व्यक्तीला अटक (Arrest) करण्यात आली आहे. ही घटना मालाड (पश्चिम) येथील अंबुजवाडी, मालवणी (Malavani) येथील एकता चाळ सोसायटीत बुधवारी रात्री 10 वाजता घडली. मृत सुरेंद्र गौड आणि सैफ अली शेख हे दोघेही मजूर म्हणून काम करायचे. मृत व्यक्ती त्याच्या घराबाहेर टेप रेकॉर्डरवर गाणी ऐकत होता.

आरोपींनी त्याला आवाज कमी करण्यास सांगितले आणि यावरून त्यांच्यात भांडण झाले. पीडितच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात आणण्यात आले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शेखचा गौडचा खून करण्याचा हेतू नव्हता परंतु नंतरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हेही वाचा Nashik Crime: नाशिकमध्ये शस्त्रे बाळगल्या प्रकरणी 7 पुजारी अटकेत, देशी बनावटीचे पिस्तूल, विळा, चाकू आणि हॉकी स्टिक जप्त

गौड यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून शेखला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत हत्ये प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याला मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले आणि आमच्या कोठडीत रवानगी करण्यात आली, असे मालवणी पोलिस स्टेशनचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अर्जुन राजणे यांनी सांगितले.