Pune: प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) अलीकडील आकडेवारीनुसार, पुण्यातील शाळकरी(Pune School Buses) मुलांची वाहतूक करणाऱ्या जवळपास 50% स्कूल बसेस आणि व्हॅन्स वैध फिटनेस(Fitness Certificate)प्रमाणपत्राशिवाय चालवल्या जात आहेत. पुणे आरटीओकडे नोंदणीकृत 6,051 शालेय वाहतूक वाहनांपैकी 2,927 वाहने फिटनेस प्रमाणपत्राशिवाय असल्याचे आढळून आले. तर, केवळ 3,124 वाहनांकडे पूर्ण कागदपत्रे आहेत. (हेही वाचा:Pune Porsche Accident Case: अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले, दुसऱ्याचेच नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले; पुणे पोलिस आयुक्तांची माहिती )
यावरून पालकांनीही संबंधित गोष्टीबाबत संताप व्यक्त केला आहे. 'हे आकडे पाहता, आरटीओ काय कारवाई करत आहे? ही वाहने रस्त्यावर उतरवली आहेत का? वाहनांमध्ये तांत्रिक समस्या असू शकतात ज्यामुळे लक्षणीय धोका निर्माण होऊ शकतो.' असे प्रश्न पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. स्कूल बस परवाने आरटीओकडून पाच वर्षांच्या कालावधीसाठी दिले जातात आणि त्यानंतर त्यांचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. व्हॅनसाठी, तथापि, राज्य सरकारने नवीन परवाने देणे बंद केले आहे, जर ते आरटीओ मानकांची पूर्तता करत असतील तरच त्यांच्या नूतनीकरणास परवानगी देतात.
महाराष्ट्रातील स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी निदर्शनास आणून दिले की फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या अनेक वाहनांकडे आरटीओकडून आवश्यक स्कूल बस परवानग्या नसतात. “ही वाहने बेकायदेशीरपणे चालवली जात आहेत. अधिकारी फिटनेस प्रमाणपत्र प्रक्रियेला बायपास करण्यास टाळतात. फिटनेस प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनांच्या यादीत अर्धाहून अधिक वाहने व्हॅन्स आणि बस या शालेय वाहतुकीची कायदेशीर वाहने आहेत. परंतु त्या बेकायदेशीरपणे चालवल्या जाऊ शकतात. अशा ऑपरेटर्सना ओळखणे आणि दंड करणे ही आरटीओची जबाबदारी आहे,' असे गर्ग यांनी म्हटले.
पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) च्या विद्यार्थी वाहनतुक संघटनेचे अध्यक्ष बापू भावे यांनीही आपल्या चिंता व्यक्त केल्या. “शाळकरी मुलांच्या बेकायदेशीर वाहतुकीत गुंतलेल्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा माझा मानस आहे. जर आरटीओकडे हा डेटा असेल तर त्यांनी त्वरीत कारवाई करावी. फिटनेस प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संपूर्ण दिवस लागतो. वाहनमालकांना सामावून घेण्यासाठी, आरटीओ दिवे घाट चाचणी ट्रॅक आठवड्याच्या शेवटी खुला ठेवण्याचा विचार करू शकते, जेणेकरून त्यांचा कामाचा दिवस वाया जाणार नाही,” त्यांनी सुचवले.
वाचन सुरू ठेवा