NDRF Rescue Villagers in Palghar: पालघरमध्ये मुसळधार पावसाने कहर( Heavy Rain in Palghar) केला आहे. काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. रेल्वेची सेवा मंदावली आहे. पालघरमधीस उसगावात पुरामध्ये अडकलेल्या 16 जणांची एनडीआरएफच्या टीमने सुटका(NDRF Rescue villagers in Palghar) केली आहे. मुसळधार पावसामुळे देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. हा पूल पाण्याखाली गेल्याने पालघर आणि मनोर वाडा यांच्यामधील संपर्क तुटला आहे. दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प पडली आहे. तर पश्चिम बोईसर-उमरोली स्टेशनदरम्यान रेल्वे ट्रकच्या अप आणि डाऊन दोन्ही लाईनमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे ट्रेन संथगतीने जात आहे. (हेही वाचा:Navi Mumbai Rain: नवी मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, घरात पाणी शिरले, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप; अनेक ठिकाणी वाहने पडली बंद )
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात एनडीआरएफच्या पथकांना तैनात करण्यात आले आहे. मुंबईतील कुर्ला, घाटकोपर, तर पालघर आणि ठाण्यात एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. शहापूरमध्येही पूर परिस्थिती उद्भवली असून, वाशिंदमधील सृष्टी फार्मवर 150 पर्यटक अडकले होते. या पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे जवान दाखल झाले होते.
#WATCH | NDRF team rescues 16 people from village Usgaon, Palghar where they got trapped in inundated fields: NDRF
(Source: NDRF) pic.twitter.com/UAiVrC1CEv
— ANI (@ANI) July 7, 2024
मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली. उत्तर प्रदेश, बिहारकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या आणि तेथून मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर उभ्या करण्यात आल्या आहेत. लोकल सेवेवरही पावसाचा परिणाम पहायला मिळाला.