Supriya Sule: 'खासदार निलंबन कारवाईची पुनरावृत्ती नको', सुप्रिया सुळे यांच्याकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना रोखठक शुभेच्छा (Watch Video)
Supriya Sule | (Photo Credits: X)

ओम बिर्ला (Om Birla) यांची लोकसभा अध्यक्ष (Lok Sabha Speaker) म्हणून आवाजी मतदानाने निवड बुधवारी (26 जून) करण्यात आली. या वेळी अध्यक्षांच्या अभिनंदन ठरावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपल्या खास आणि रोखठोक शब्दांमध्ये भाष्य केले. त्यांनी लोकसभा अध्यक्ष्यांना शुभेच्छा तर दिल्याच पण त्यांना त्यांच्या कार्याची जाणीवही करुन दिली. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी नवनिर्वाचीत लकसभेत केलेल्या पहिल्याच भाषणात आपली आक्रमकदा दाखवल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते खासदार अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनीही असेच काहीसे भाष्य केले.

''निलंबनाच्या कारवाईमुळे सर्वांनाच दु:ख''

लोकसभा अध्यक्षांना उद्देशून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "पाच वर्षात तुम्ही खूप चांगले काम केले आहे. पण माझ्या 150 सहकाऱ्यांना निलंबित केले, तेव्हा आम्ही सगळेच दु:खी झालो होतो. त्यामुळे येत्या 5 वर्षात तुम्हाला निलंबनाचा विचार होणार नाही, यासाठी प्रयत्न व्हायला हवे." याच वेळी सुप्रिया सुळे यांनी ओम बिर्ला यांना शुभेच्छाही दिल्या. (हेही वाचा, Lok Sabha Speaker Election 2024: लोकसभा अध्यक्ष पदी पुन्हा Om Birla!)

व्हिडिओ

अखिलेश यादव यांच्याकडूनही निलंबन कारवाईवर भाष्य

दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी बुधवारी ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आपल्या अभिनंदन संदेशात यादव यांनी सभागृहाची प्रतिष्ठा राखण्याच्या महत्त्वावर भर दिला आणि खासदारांना निलंबित करण्यासारख्या उपाययोजना केल्या जाणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त केली.

यादव यांनी सभापतींकडून निःपक्षपातीपणाची आवश्यकता अधोरेखित केली आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्यांचे मत मांडण्यासाठी समान संधी दिली पाहिजे यावर भर दिला. "आम्हाला विश्वास आहे की तुम्ही भेदभाव न करता पुढे जाल आणि सभापती म्हणून तुम्ही प्रत्येक पक्षाला समान संधी आणि सन्मान द्याल. निःपक्षपातीपणा ही या महान पदाची मोठी जबाबदारी आहे. तुम्ही इथे बसून लोकशाही न्यायालयाचे सरन्यायाधीश आहात," यादव म्हणाले. लोकप्रतिनिधींचा आवाज दडपला जाऊ नये आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचणाऱ्या निलंबनासारख्या कृती टाळाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

व्हिडिओ

दरम्यान, लोकसभा सदस्य म्हणून सभागृात उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांना बोलण्याची मी संधी देत असतो. हे सदस्य कोणत्या पक्षाच्या विचारधारेचे पालन करत असले तरी त्यांना लोकांनी निवडून दिलेले असते. त्यामुळे सभागृहात त्यांनी संसदीय नियमांचे पालन करावे. जेणेकरुन मला कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलावे लागणार नाही. मला कोणावरही कारवाई करण्याची इच्छा नसते, पण कधी कधी माझ्यासमोर पर्यायही उपलब्ध असत नाही, अशी भावना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्या यांनी व्यक्त केली.