महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यापाठोपाठ आज (27 ऑक्टोबर) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांना कोरोनाची लागण (Coronavirus) झाल्याची माहिती समोर आली आहे. आज ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'काल माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन.' असे म्हटले आहे.
सुनील तटकरे यांना कोरोनाची लगण झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या वर प्रेम करणार्यांकडून, हितचिंतकांकडून तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडूनही आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Ajit Pawar Tested COVID19 Positive : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह, उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल.
सुनील तटकरे यांचं ट्वीट
काल माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन.#Covid_19
— Sunil Tatkare (@SunilTatkare) October 27, 2020
सुनील तटकरे हे17 व्या लोकसभेचे सदस्य आहेत. ते रायगड लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व करतात तर त्यांची लेक आदिती तटकरे या महाराष्ट्र राज्यात आमदार असून पर्यटन विभागाच्या राज्यमंत्री पदाची त्यांच्यावर जबाबदारी आहे.
अजित पवार, सुनील तटकरे यांच्याप्रमाणे महाराष्ट्रात सध्या विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांंच्यावर मुंबईत सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.