आकाशवाणी केंद्रावर पुन्हा मराठी वर्तापत्र सुरू करा; सुनील तटकरे यांनी मांडला लोकसभेत मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा मुद्दा
Sunil Tatkare (Photo Credits: Twitter)

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा मिळावा म्हणून मागील अनेल वर्षांपासून मागणी केली जात आहे. या मागणीकडे पुन्हा लक्ष केंद्रीत करण्यासाठी काल (27 जून) संसदेत मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे(Sunil Tatkare) यांनी यासाठी मागणी केली आहे. लोकसभेत त्यांनी शून्य प्रहरामध्ये ही लक्षवेधी मांडली होती. यावेळेस आकाशवाणी (AIR) दिल्लीमध्ये पुन्हा मराठी भाषेतून वार्तापत्र सुरू करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

सुनील तटकरे ट्विट

दिल्लीच्या आकाशवाणी केंद्रातून मराठी वार्तापत्र बंद आहे. हा प्रकार म्हणजे मराठी भाषेची गळचेपी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.असेही तटकरे यांनी म्हटले आहे. सध्या देशातील केवळ 6 भाषांना अभिजात दर्जा देण्यात आला आहे. खासदार डॉ अमोल कोल्हे आणि डॉ. हिना गावित यांच्या लोकसभेतील भाषणाला नरेंद्र मोदींनी दिली कौतुकाची थाप (Watch Video)

17 व्या लोकसभेनंतर सध्या दिल्लीमध्ये सुरू असलेलं नव्या मोदी सरकारचं हे पहिलंचं अधिवेशन आहे. येत्या 5 जुलै दिवशी संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.