NCP | Twitter

निवडणूक आयोगाने एनसीपीचं (NCP) पक्षचिन्ह आणि नाव अजित पवार यांच्याकडे सोपवल्या नंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आज राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निकालाकडे आता सार्‍यांचे लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा निवडणूकांच्या पूर्वी राहुल नार्वेकर यांच्याकडून दिला जाणारा निकाल महत्त्वाचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार विरूद्ध शरद पवार गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांनी एकमेकांच्या समर्थक आमदारांविरोधात विधानसभा अध्यक्षाकडं अपात्रतेचे दावे दाखल केले त्याचा आज निकाल जाहीर केला जाणार आहे.

दरम्यान शरद पवार गटाने निवडणूक आयोगाचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करून देण्यात आल्याचं म्हटलं आहे. त्या निकालाविरूद्ध शरद पवार गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहे. पण तत्पूर्वी आज विधानसभा अध्यक्ष काय निकाल देणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षाबाबत निकाल देताना पक्षाची घटना सादर केली नसल्याचं सांगत त्यांनी उपलब्ध जुन्या घटनेच्या आधारे निकाल दिला होता. Sharad Pawar Faction Merging Congress: काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या वृत्ताचे शरद पवार गटाकडून खंडन.

सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना 31 जानेवारी पर्यंत निकाल देण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र साक्षी नोंदवण्याचं काम बाकी असल्याने त्यांनी कोर्टाकडून अधिकचा वेळ मागून घेत 15 फेब्रुवारी पर्यंत निकाल देण्याची मुदतवाढ दिली. त्यानुसार आज शिवसेना पक्षाच्या धर्तीवर राहुल नार्वेकर निकाल देणार का? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला नाव देण्यात आले आहे मात्र अद्याप पक्ष चिन्ह देण्यात आलेले नाही.