Devendra Fadnavis, Ajit Pawar | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Maharashtra Monsoon Session 2019: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बालभारतीने (Balbharti) सुरु केलेल्या अंकगणित वाचनाच्या नवीन पद्धतीवरुन सरकारला जोरदार धारेवर धरले. शिक्षण विभागाच्या या नव्या प्रयोगाची खिल्ली उडवताना अजित पवार यांनी आडनावात संख्येचा उल्लेख असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule) यांनाही सोडले नाही. नव्या अंकगणित वाचनानुसार, 'आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री बावनकुळे कसं म्हणायचं? मुख्यमंत्री देवेंद्र फडण दोन.. शून्य, उर्जामंत्री पन्नास.. दोन...कुळे, विसपुते… यांना 20 वर शून्य पुते, अशी हाक मारायची का आम्ही'', असा सवाल अजित पवार यांनी केला.' दरम्यान, 'मोबाईल नंबर कसा बोलायचा, 9892 कसं म्हणायचं? 90 वर 8, 90 वर 2 असं म्हणायचं का? ', असंही अजित पवार यांनी म्हटलं.

अजित पवार यांनी नवनिर्वाचीत गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. मुंबईच्या विकास आराखडय़ात 1 लाख कोटीचा घोटाळा झाला असून त्यातून 10 हजार कोटी रुपये मुख्यमंत्री कार्यालयाला मिळाल्याचा आरोप करणारे राधाकृष्ण विखे-पाटीलच आता गृहनिर्माण खात्याचे मंत्री झाले आहेत. त्यामुळे आता त्यांनीच त्यांच्या या आरोपांवर खुलासा करावा, असे अजित पवार म्हणाले. भाजप सरकारला ठग्ज ऑफ हिंदुस्थान म्हणणारे विखे-पाटील भाजपच्या ठगांमध्ये जाऊन बसल्याची कोपरखळीही अजित पवार यांनी विखे पाटील यांना लगावली. (हेही वाचा, Maharashtra Budget 2019-20: महाराष्ट्र अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यापूर्वी ट्वीटवर फुटल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप, देवेंद्र फडणवीस यांनी केला खुलासा)

अजित पवार ट्विट

दरम्यान, या वेळी बोलताना, अजित पवार यांनी 'जलयुक्त शिवार योजनेत 5 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ज्यांनी केला, त्यांनाच मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात जागा दिली आहे', असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरुन मुख्यमंत्री फडणवीस यांना कोंडीत पकडले.