धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस (फोटो सौजन्य-फेसबुक)

आज (18 जून) महाराष्ट्र अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यात आला. तत्पूर्वी अर्थसंकल्प सादरीकरणापूर्वी तो फुटल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केला. या आरोपावरुन विरोधकांकडून सभागृत अर्थसंकल्प सुरु असताना गदारोळ केला. त्यामुळे अर्थसंकल्प ट्वीटवर फुटणे हा सभागृहाचा अपमान असल्याने सरकारने सभागृहाची माफी मागावी असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.

धनजंय मुंडे यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात सादर होण्यापूर्वीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या ट्वीटवरवरुन तो फुटला आहे. त्यामुळे जबाबदारीच्या पदावर असताना त्यांच्याकडून अशा पद्धतीची चूक घडणे ही दुर्दैवी बाब आहे.

तर सुधीर मुनटंगीवर यांच्या ट्वीटरवरुन अर्थसंकल्प सादर होत असल्याचे लाईव्ह अपडेट पोस्ट केले जात होते. त्यामध्ये मृद आणि जलसंधारण विभागासाठी किती रुपयांची तरदूत केली आहे हे सांगण्यात येत होते. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर करण्यापूर्वीच पोस्ट केल्याचा आरोप मुनगंटीवार यांच्यावर करण्यात आला.

(Maharashtra Budget 2019-20: अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प 2019 मध्ये शेतकऱ्याला काय दिलं पाहा)

मात्र या प्रकारावर मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. फडणवीस यांनी विरोधकांनी केलेल्या या आरोपाचे स्पष्टीकरण देताना असे म्हटले आहे की, अर्थसंकल्प फुटलेला नसून विरोधकांचा गैरसमज झालेला आहे. परंतु सध्या डिजिटल माध्यम अधिक प्रगतीशील झाल्याने ट्वीटरवर अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्यावर त्याचे अपडेट ट्वीटरवर येत आहेत. हाच बदलेल्या तंत्रज्ञानाचा परिणाम असल्याचे ही फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे विरोधकांनी या बाबी लक्षात घेऊन ट्वीटर हे सकारात्मक कामासाठी वापरण्यात येत असल्याचे ही फडणवीस यांनी म्हटले आहे.