NCP कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी शरद पवार, अमोल कोल्हे, छगन भुजबळ सह या दिग्गजांचा समावेश
Sharad Pawar | (Photo credit : Facebook)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून सर्व पक्षांकडून जोरदार प्रयत्न पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नुकतीच स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि छगन भुजबळ यांच्यासह 40 नेत्यांचा समावेश आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या वाटेला अपयश आले होते. परंतु, येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी मोठा विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीने महत्वाच्या नेत्यांना प्रचारासाठी रिंगणात उतरण्याचे ठरवले आहे.

भाजपने तोडफोडीचे राजकारण करत लोकसभेप्रमाणही निवडणूकही मोठ्या उंचीवर नेवून ठेवली आहे. त्यामुळे विरोधी पक्षानेत्यांसाठीही ही निवडणूक फार महत्वाची ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार प्रचाराचा धुरळा उडवण्यासाठी सज्ज आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या पक्षाला मोठा जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे, असे विधान स्वत: शरद पवार यांनी केले होते. राष्ट्रवादीतून अनेक नेत्यांनी भाजप- शिवसेना पक्षात प्रवेश केला असला तरी, शरद पवार यांनी पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वासही दाखवला आहे. हे देखील वाचा- Maharashtra Assembly Election 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 'हे' असतील भाजपचे स्टार प्रचारक; पहा यादी.

ANI चे ट्विट-

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक येत्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने झेंडा रवला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.