कोरोना विषाणू महाराष्ट्रासह संपूर्ण देशात थैमान घालताना दिसत आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. परिणामी, राज्यातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम रद्द किंवा लॉकडाऊनच्या निर्बंधाखाली पार पाडावी लागली आहेत. महत्वाचे म्हणजे, दरवर्षी धुकधडाक्यात साजरा केला जाणारा गणेशोत्सवदेखील यंदा शांतेत पार पडला आहे. याच पार्श्वभूमीवर कळव्यात (Kalwa) कोरोनाबाधितांची प्रतिदिन वाढणारी संख्या लक्षात नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे कळव्याच्या पारसिकनगर (Parsiknagar) येथे दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे.
कोरोनामुळे महाराष्ट्रात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच मुंबई, पुणे, ठाणे या शहरांत कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने पसरत चालला आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येबाबत कळव्यातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच दरवर्षी पारसिकनगर येथे साजरा करण्यात येणार सार्वजनिक नवरात्रौत्सव रद्द करावा, अशी विनंती स्थानिक नागरिकांनी जितेंद्र आव्हाड यांना केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हे देखील वाचा- Pravin Darekar Criticizes Shiv Sena: शिवसेना दुर्लक्ष करते म्हणून थोडासा पाऊस पडला तरी, मुंबई पाण्याखाली जाते- प्रविण दरेकर
जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट-
#covid च्या वाढत्या रुग्ण संख्ये बाबत कळव्यातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे व प्रती वर्षी होणारा नवरात्रौत्सव रद्द करावा अशी विनंीही केली आहे त्यामुळे पारसिकनगर सार्वजनिक नवरत्रौत्सव रद्द करण्यात येत आहे pic.twitter.com/3xpZpILucq
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 23, 2020
महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढत आहे, त्यामुळे या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणे, दर्शनाला जाणे टाळावे. परंतु, तसे न केल्यास पुढील दिवाळीही धोक्यात जाऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे इतर मंडळांनी देखील त्या दृष्टीने विचार करुन नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा किंवा रद्द करावा असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 12 लाख 42 हजार 770 वर पोहचली आहे. यापैकी 33 हजार 407 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 9 लाख 36 हजार 554 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 2 लाख 72 हजार 410 रुग्णांवर उपचार सुरु आहे.