अमरावतीच्या खासदार Navneet Rana यांनी केला जीवे मारण्याचे फोन कॉल्स आल्याचा दावा; दिल्ली पोलिसांत दाखल केली तक्रार
Navneet Ravi Rana | (Photo Credits: Facebook)

लोकसभेतील अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी बुधवार, 25 मे दिवशी दिल्ली (Delhi) पोलिसांकडे त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचे कॉल्स येत असल्याची तक्रार केली आहे. काही दिवसांपूर्वीच नवनीत राणा यांना मातोश्री या मुख्यमंत्र्यांच्या खाजगी निवास्स्थानाबाहेर हनुमान चालिसा पठणाच्या आग्रहावरून अटक झाली होती. त्यानंतर 11 दिवसांच्या जेलवारीनंतर त्यांची जामीनावर सुटका झाली आहे.

नवनीत राणा यांच्या पर्सनल असिस्टंट कडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. खासदार राणा यांना 11 कॉल्स आले होते. हे सारे कॉल्स मंगळवारी 5.27 ते 5.47 PM या वेळेतील आहेत. पर्सनल मोबाईल नंबर वर हे कॉल्स आल्याची माहिती देण्यात आली आहे. फोनवर समोरून बोलणारी व्यक्ती चूकीच्या भाषेचा वापर करत होती. जर नवनीत राणा महाराष्ट्रात आल्या तर त्यांना मारलं जाईल असा दावा तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. हे देखील नक्की वाचा: मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांना आव्हान देणाऱ्या Navneet Rana कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्याबद्दल सविस्तर .

फोन वरून देण्यात आलेल्या धमकीमध्ये 'जर तुम्ही परत हनुमान चालिसा म्हटली तर तुम्हांला ठार मारलं जाईल' असं सांगण्यात आले आहे. नवी दिल्ली मध्ये North Avenue police station मध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर कायदेशीर करवाई केली जाईल असे पोलिस अधिकार्‍यां कडून सांगण्यात आले आहे.

एप्रिल महिन्यात राणा दाम्पत्याने मातोश्री बाहेर हनुमान चालीस पठणाचा आग्रह केल्याने मोठा राडा झाला होता. 23 एप्रिलला पोलिसांनी यावरून त्यांना अटक केली. त्यावेळी त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप लावण्यात आला होता. 4 मेला रवी राणा, नवनीत राणा यांना मुंबई कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

काल नवनीत राणा यांनी सीबीआय कडे संजय पांडे आणि अनिल परब यांच्या विरूद्ध तक्रार दाखल करायला पोहचल्या होत्या.