Accident (PC - File Photo)

Accident News: पुणे मुंबई (Pune Mumbai) द्रुतगती मार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर रसायनी पोलीस चौकीजवळ शुक्रवारी रात्री कंटेनर ट्रकने धडक दिल्याने राज्य परिवहनच्या उमरगा-ठाणे मार्गावरील कंडक्टरचा मृत्यू (Death) झाला. बस चालकाच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे.या अपघातामुळे वाहतूक काही काळ ठप्प होती. पाठीमागून येऊन कंटेनच ट्रकने धडक दिल्याने अपघाता झाला. आणि कंंडक्टरचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची माहिती घेतली आणि कंडक्टराच्या अपघाती मृत्यूची नोंद घेतली.

अपघात असा घडला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर ट्रकने बसला धडक दिली तेव्हा कंडक्टर कंडक्टर एका महिला प्रवाशाला खाली उतरण्यास मदत करत होते. शिवराज राम माळी असे मृत कंडक्टराचे नाव आहे. या अपघातात माळी यांचा जागीच मृत्यू झाला, तर बसचा चालक प्रदीप लक्ष्मण सोनवणे याला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वाहन चालकावर गुन्हा दाखल

याप्रकरणी रसायनी पोलिसांनी कंटेनरचालकाविरुद्ध रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल केला आहे.या अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतुक ठप्प होती. बस चालकाला रुग्णालात दाखल करण्यात आले आहे. सरकारी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलीसांनी दिली. ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.