Kolhapur News: आलिशान कारची टेम्पोला जोरदार धडक,अपघातात दोन महिला गंभीर जखमी; घटना सीसीटीव्हीत कैद

फुलेवाडीत ट्रक आणि आलिशान कारचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघात (Accident) कारचालकाने टेम्पोला धडक दिल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत

Kolhapur News: आलिशान कारची टेम्पोला जोरदार धडक,अपघातात दोन महिला गंभीर जखमी; घटना सीसीटीव्हीत कैद
Accident (PC - File Photo)

Kolhapur News: कोल्हापूर (Kolhapur) शहरात फुलेवाडीत ट्रक आणि आलिशान कारचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघात (Accident) कारचालकाने टेम्पोला धडक दिल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कार चालक दारूच्या नशेत होता. दारू पिऊन कार चालवत होता.  अपघात झाल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. फुलेवाडीतील रिंग रोडवर ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील फुलेवाडीतील रिंग रोडवर टेम्पो जात होता. टेम्पोमध्ये दोन महिला प्रवास करत होत्या, मध्यरात्रीच्या वेळी आलिशान कारचालकाने भरधाव वेगात टेम्पोला जोरदार धडक दिली. कारचालक मध्यधुंद अवस्थेत होता. या धडकेत कार जाग्यावर फिरल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या अपघातानंतर कार चालक फरार झाला आहे.

या अपघाताचा व्हिडिओ जवळील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतला आहे. जखमी महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलीसांनी फरार झालेल्या कार चालकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दारू पिऊन कार चालवत असल्याने पोलीसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

 

(The above story first appeared on LatestLY on Sep 28, 2023 12:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).