
शौक्षणीक सहलीनिमित्त (School Picnic) इतर विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत रायगड जिल्ह्यातील एका थीम पार्क (Raigad Theme Park) येथे गेलेल्या एका 14 वर्षीय मुलाचा आकस्मिक मृत्यू (Student Death) झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी 4.00 वाजणेच्या सुमारास घडली. पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, सदर शाळकरी मुलास हृदयविकाराचा झटका (Cardiac Arrest) आला. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मृत विद्यार्थ्याचे नाव आयुष सिंग असे आहे, तो घणसोली येथील नवी मुंबई (Navi Mumbai) मनपा संचलीत शाळेत (NMMC School) आठवी इयत्तेत शिकत होता. विद्यार्थ्याच्या मृत्यूची बातमी समजताच विद्यार्थ्यांमध्येही काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच, अनेक पालकांनीही आपल्याय पाल्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
शालेय सहलीसाठी एकाच वेळी 1000 हून अधिक विद्यार्थी
एनएमएमसीच्या शिक्षण विभागाने चिंचपाडा, घणसोली आणि तुर्भे येथील नागरी शाळांमधील तब्बल 1,018 विद्यार्थ्यांना रायगड थीम पार्कमध्ये घेऊन पिकनिकचे आयोजन केले होते. ज्यामुळे एकाच वेळी विद्यार्थ्यांची मोठी संख्या एकत्र जमली होती. (हेही वाचा, HC On School Safety And Child Protection: विद्यार्थी आणि शालेय सुरक्षा याची जबाबदारी कोणाची? कोर्टाचा सवाल; राज्य सरकार काय उत्तर देणार?)
मनसेकडून शिक्षण विभागावर निष्काळजीपणाचा आरोप
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त करत शिक्षण विभागाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले. नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे यांनी आरोप केला की, विद्यार्थ्याच्या मृत्यू शिक्षण विभागच जबाबदार आहे. सहलीवर असलेल्या विद्यार्थ्यास अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यास त्वरित वैद्यकीय मदत देण्याऐवजी दुर्लक्ष केल्याचा आरोप काळे यांनी केला. तसेच, नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी आणि उपमहानगरपालिका आयुक्तांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. (हेही वाचा, School Bus New Guidelines: खासगी शाळांसाठी विद्यार्थी बस वाहतूक नियमावली, पुढील शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी)
विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण काय?
एनएमएमसी आयुक्त कैलास शिंदे यांनी सांगितले की, स्थानिक पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. नागरी रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालानुसार, मृत्यूचे कारण मायोकार्डियल इन्फार्क्शन (हृदयविकाराचा झटका) असल्याचे आढळून आले.
रायगडचे पोलिस अधीक्षक (एसपी) सोमनाथ घार्गे यांनी पुष्टी केली की विद्यार्थ्याने अस्वस्थत वाटू लागल्याचे सांगितल्यानंतर त्यास, थीम पार्कच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ताबडतोब नेण्यात आले आणि नंतर खोपोली येथील रुग्णालयात हलविण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हृदयविकाराचा झटका मृत्यूचे कारण असल्याचे निश्चित झाले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्याच्या अचानक कोसळण्यामागे कोणत्याही वैद्यकीय पूर्वस्थिती कारणीभूत आहेत का हे निश्चित करण्यासाठी अधिकारी पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे शालेय सहलींदरम्यान विद्यार्थ्याचे आरोग्य आणि सुरक्षा उपायांवर चिंता निर्माण झाली आहे.