Navi Mumbai Robbery: नवी मुंबईत फिर हेरा फेरी! श्याम, बाबूराव, राजू स्टाइलमध्ये सोनाराच्या दुकानात दरोडा
Robbery | (Photo Credit: Archived, edited, representative images)

नवी मुंबईत (Navi Mumbai) सोनाराच्या दुकानात (Gold Shop) चोरीची अजब घटना घडली आहे. तुम्हाला फिर हेरा फेरी (Phir Hera Pheri) सिनेमा आठवत असेल. त्यात बाबूराव (Baburao), श्याम (Shyam) आणि राजू (Raju) या कॅरेक्टरने त्यांच्या शेजाऱ्याच्या घरी कोटींच्या मालावर डल्ला मारला होता. आता नवी मुंबईतही (Navi Mumbai) याच पध्दतीने एका सोनाराच्या दुकानावर दरोडा टाकला आहे. नवी मुंबईतील कामोठे (Kamothe) येथे नेपाळमधून (Nepal) आलेल्या तीन जणांनी हॉटेल (Hotel) सुरु करण्यासाठी एक ब्लॉक किरायाने (Block On Rent) घेतला. त्या ब्लॉकमध्ये या तिघांनी एक हॉटेल (Hotel) सुरु केलं. काही दिवसांनंतर संधी साधत दोन्ही दुकानांच्यामध्ये असलेल्या भिंतीला भगदाड पाडून सोन्याच्या दुकानातील तब्बल 5 लाख 88 हजारांचा माल लंपास केला. दरम्यान चोरांनी 15 किलोंचा चांदीचा (Silver) ऐवज लुटल्याची माहिती मिळत आहे.

 

चोरट्यांना आठ दिवसांपूर्वी सोनाराच्या दुकानाच्या बाजूला लागूनच असलेले एक दुकान भाड्याने (Rental Shop) घेतलं. तसंच चोरी (Robbery) करण्यापूर्वी त्यांनी दुकानाचं निरीक्षणही करुन ठेवलं होतं. तरी या प्रकरणी कामोठे पोलिस (Kamothe Police) तपास करत असुन या चोरीसंबंधीत पोलिस निरीक्षक स्मिता जाधव (Smita Jadhav) यांनी दिली आहे. चोरट्यांना लहान तिजोरी फोडण्यात यश आले होते. त्यांनी लहान तिजोरीतील सहा लाख (6 Lakh) किंमतीचे चांदीचे दागिने (Silver Ornaments) लंपास केले. (हे ही वाचा:- Fraud Exam: डीवायएसपींनी एलएलबी परीक्षेत स्वतःच्या नावाने बसवला डमी उमेदवार, खुद्द पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल)

 

तरी नवी मुंबईतील (Navi Mumbai) या घटनेनंतर पोलिसांनी (Police) नवी मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कुणालाही घर किंवा दुकान भाडे (Rental) तत्वावर देताना भाडेकरुची सखोल माहिती घेवून करारपत्र तयार करुनचं भाडेकरु ठेवावे अशा सुचना नवी मुंबई पोलिसांकडून (Navi Mumbai Police) देण्यात आल्या आहेत.