नवी मुंबईत राजकीय खळबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नगरसेवक भाजपात जाणार?
NCP

नवी मुंबईत (Navi Mumbai) राजकीय खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (NCP) नगरसेवक भाजप (BJP) पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तर आज पार पडलेल्या एका बैठकीत जवळजवळ 52 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे ठरविले आहे. याबद्दल अधिक गोष्टी समोर आल्या नसून गणेश नाईक (Ganesh Naik) हे भाजपात प्रवेश करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सध्या नवी मुंबईत राजकरण अधिकच तापले असून नगरसेवकांनी भाजप मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जर राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यास तेथील राष्ट्रवादीची महापालिकेमधील सत्ता जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्व नगरसेवकांनी एकमताने भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच गणेश नाईक यांनी महानगरपालिका निवडणुकीवेळी राष्ट्रवादी पक्षात राहिल्यास पराभूत होण्याची शक्यता बहुतांश नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. यामुळे आता गणेश नाईक यांचा निर्णय काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. परंतु नाईक यांनी भाजप पक्षात प्रवेशावर काही वक्तव्य केलेले नाही.(सचिन अहीर यांचा शिवसेना प्रवेश; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधल शिवबंधन; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का)

तर 25 जुलैला मुंबई अध्यक्ष सचिन अहीर यांची शिवसेना प्रवेशाबाबत गेले काही काळ राजकीय वर्तुळात चर्चा होती. अखेर अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ सोडत शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधले आहे. त्यावेळी अहिर यांनी असे म्हटले आहे की,गेली अनेक वर्षे मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत काम केले. आजही माझ्या हृदयात शरद पवार यांचे स्थान कायम आहे.