Ratan Tata,Cyrus Mistry | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्यूनल (National Company Law Appellate Tribunal) ने टाटा समूहाला एक मोठा धक्का दिला आहे. एनसीएएलटीने साइ‍रस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या बाजूने आपला निर्णय देत मिस्त्री यांनाच टाटा सन्सचे अध्यक्ष करण्यात यावे. त्यांना पदावरुन हटवने हे चुकीचे होते, असा निर्णय एनसीएएलटी(NCALT) ने बुधवारी (18 डिसेंबर 2019) दिली. साइरस मिस्त्री यांना टाटा समूह (Tata Sons) अध्यक्ष पदावरुन दूर करण्यात आले होते. या निर्णयाविरुद्ध मिस्त्री यांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी) कडे अपील केले होते. मात्र, एनसीएलटीमधील केस हारल्यानंतर सायरस मिस्त्री (Cyrus Mistry)  यांनी अपीलेट ट्रिब्यूनल येथे दाद मागितली. इथे मिस्त्री यांच्या बाजूने निकाल लागला.

दरम्यान, अपीलेट ट्रिब्यूनलने जुलैमध्येच आपला अहवाल पूर्ण केला होता. मात्र, त्यावरील आपला निर्णय राखून ठेवला होता. एनसीएएलटीने टाटा सन्स (Tata Sons) चेअरमन पदावर करण्यात आलेल्या एन चंद्रशेखरन यांची नियुक्तीही चुकीची असल्याचे म्हटले आहे. चंद्रशेखरन हे टाटा सन्सचे फेब्रुवारी 2017 मध्ये चेअरमन बनले होते. एनसीएलटीच्या निर्णयानंतर आपील करण्यासाठी टाटा सन्सने 4 आठवड्यांची मूदत मागितली आहे. त्यास एनसीएलटीने मान्यता दिली आहे.टाटा सन्स टाटा समूहाच्या कंपनीची प्रमोटर आहे.

साइरस मिस्त्री यांना ऑक्टोबर 2016 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हटविण्यात आले होते. त्यानंतर दोन महिन्यांनी मिस्त्री यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबाच्या दोन कंपन्या- सायरस इन्वेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि स्टर्लिंग इन्वेस्टमेंट कॉर्प ने टाटा सन्स च्या निर्णयाविरुद्ध नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलएटी) मुंबई पीठाकडे आव्हान दिले होते. या कंपन्यांचे म्हणने होते की, मिस्त्री यांना हटविण्याचा निर्णय कंपनीज एक्ट नियमांनुसार घेण्यात आला नाही. त्यांना टाटा सन्सच्या कमी आणि रतन टाटा यांच्या हस्तक्षेपाचाही दखल घेण्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, जुलै 2018 मध्ये एनसीएएलटीने दोन्ही दावे फेटाळून लावले होते. त्यामुळे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी) मध्ये विरोधात निर्णय आल्यानंतर मिस्त्री यांनी विरोधा आपील केले होते. (हेही वाचा, Tata Motors कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! Economic Slowdown असला तरी नोकरी सुरक्षीत)

एएनआय ट्विट

एनसीएलएटीने 9 जुलै 2018 मध्ये म्हटले होते की, टाटा सन्सचा बोर्ड साइरस मिस्त्री यांना हटविण्याच्या बाजूने होता. मिस्त्री यांना हटविण्यात आले कारण कंपनी बोर्ड आणि मोठ्या शेअरधारकांना त्यांच्यावर विश्वस नव्हता. 2012 मध्ये रतन टाटा यांच्या निवृत्तीनंतर साइरस मिस्त्री टाटा सन्सचे सहावे अध्यक्ष बनले होते. मिस्त्री कुटुंबीयांकडे टाटा सन्सची 18.4% भागिदारी आहे.